Skip to content

Ajit Pawar | शालिनीताईंचा मानसिक तोल ढासळला; उदयकुमार आहेरांचे प्रत्युत्तर

Ajit Pawar

Ajit Pawar |  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या शालिनीताई पाटील ह्या आता वयोवृद्ध झाल्या असून वयोमानानुसार त्यांचा मानसिक तोल आता ढळला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले होते. या पत्रात त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तब्बल ९५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा दावा केला आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचा ७०,००० कोटींचा घोटाळा पचविल्याचे म्हटले आहे.

India Cleanest City | महाराष्ट्र ठरले देशातील सर्वात स्वच्छ राज्य

तसेच त्यांनी या पत्राद्वारे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही टीका केलेली आहे. हे १०० लोकांना जमा करून त्यांच्यासमोर नर्तकींना नाचवितात असा गंभीर आरोप देखील शालिनीताई पाटील यांनी केला आहे. दरम्यान, त्यांच्या या टिकेला प्रत्युत्तर देताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. शालिनीताई पाटील यांनी स्वतःच्या वयाचा विचार करून आरोप करण्याचा सल्ला उदयकुमार आहेर यांनी त्यांना दिला आहे. वयोमानानुसार त्यांचा मानसिक तोल ढासळला असून त्या केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना लक्ष करीत आहेत. पूर्व इतिहास तपासायचा झाल्यास ताईंना ते झेपणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Ajit Pawar | ‘दिलदार दादा’; अजित दादांचे प्रचारासाठी जिल्हाध्यक्षांना ‘मोठ्ठे’ गिफ्ट

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार हे महाराष्ट्रातील जनतेचे सर्वमान्य नेते आहेत स्वतःच्या शिस्तप्रिय कारभारासाठी ते देशभरात प्रसिद्ध आहेत. स्पष्ट वक्ता म्हणून त्यांची ख्याती आहे. तसेच कृषिमंत्री धनंजय मुंडे हे अतिशय कर्तृत्ववान आणि तरुण मंत्री आहेत. म्हणून त्यांच्यावर केलेले असले खोटे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहन करणार नाही. शालिनी ताईंना न्यायालयीन लढा लढायचा असेल तर तो त्यांनी खुशाल लढावा. मात्र, अशा पद्धतीचे खोटे आरोप करून गैरसमज पसरवू नये असेही उदयकुमार आहेर यावेळी यांनी म्हटले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!