Skip to content

India Cleanest City | महाराष्ट्र ठरले देशातील सर्वात स्वच्छ राज्य

India Cleanest City

India Cleanest City | महाराष्ट्र हे राज्य अनेक संस्कृती आणि विविधतेने नटलेलं राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. दरम्यान, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडून देण्यात येणारे स्वच्छ सर्वेक्षण 2023 पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यंदाच्या स्वच्छतेच्या सर्वेक्षणात महाराष्ट्राचा डंका वाजत आहे.

Dhananjay munde | अजित पवारांचा घोटाळा तर, धनंजय मुंडे घरात नर्तकीला…’,

दरवर्षी देशात केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडून देण्यात येणारे स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार जाहीर करण्यात येतात. दरम्यान, यातच इंदौर आणि सुरत यांना संयुक्तपणे भारतातील सर्वात स्वच्छ शहर घोषित करण्यात आलं असून इंदौरने सलग सातव्या वर्षी हा पुरस्कार जिंकलेला आहे. तर गूजरातमधील सुरतने पहिल्यांदाच हे यश मिळवले आहे. यासोबत नवी मुंबई हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

PM Modi | शिंदे गटाचे आमदार म्हणे, मोदी पुन्हा पंतप्रधान न झाल्यास फाशी घेईन

India Cleanest City | स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्र आघाडीवर

केंद्र सरकारने केलेल्या या सर्वेक्षणातील जाहीर करण्यात आलेल्या स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्र आघाडीवर असून महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचा क्रमांक लागलेला आहे. तर राजधानी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आलेले आहेत.

स्वच्छ सर्वेक्षण 2023 या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरीही उपस्थित होते. तर 2016 मध्ये स्वच्छ भारत मिशन-अर्बन अंतर्गत ही मोहीम सुरू करण्यात आलेली होती. महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राला स्वच्छ राज्याचा पुरस्कार मिळाला असून यामध्ये एक लाखाहून कमी लोकसंख्या असलेले सासवड शहर देशातली सर्वात स्वच्छ शहर ठरलेले आहे.

स्वच्छ सर्वेक्षणामागील हेतू नेमका काय?

2016 पासून एमओएचयूएद्वारे केले जाणारे स्वच्छ सर्वेक्षण हे जगातील सर्वात मोठे नागरी स्वच्छता आणि स्वच्छता सर्वेक्षण असून देशातील नागरिकांना सेवा पुरविण्यात सुधारणा करण्यासाठी आणि स्वच्छ शहरे तयार करण्यासाठी शहरांमध्ये निरोगी स्पर्धेची भावना निर्माण करण्यात हे महत्त्वपूर्ण ठरले आहे. स्वच्छ सर्वेक्षणाचे प्राथमिक उद्दिष्ट मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या सहभागास प्रोत्साहित करणे आणि समाजातील सर्व घटकांमध्ये शहरे तसेच सीआय बनविण्यासाठी एकत्र काम करण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे हे आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!