Skip to content

Dhananjay munde | अजित पवारांचा घोटाळा तर, धनंजय मुंडे घरात नर्तकीला…’,

Dhananjay munde

Dhananjay munde |  राज्यात सध्या आरोप प्रत्यारोपांचे आणि टीकांचे राजकारण पेटलेले असून, सत्ताधारी आणि आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. दरम्यान, अशातच काँग्रेस नेते वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना एक खळबळजनक पत्र लिहिले आहे.(Dhananjay munde)

काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी एक खळबळजनक पत्र लिहिलं आहे. या पत्रात माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी अनेक द्यावे केले आहेत. यात त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह आणखी नेत्यांवर काही गंभीर आरोप केले आहेत.

PM Modi | शिंदे गटाचे आमदार म्हणे, मोदी पुन्हा पंतप्रधान न झाल्यास फाशी घेईन

काय आहे पत्रात..?

दरम्यान, या पत्रात त्यांनी काही राजकीय आरोपांसोबतच राज्याच्या राजकारणातील खळबळ उडवून देणारा एक मुद्दा आहे. अजित पवार यांनी ९५ हजार कोटींचा घोटाळा केला असूनही, अजित दादांना सरकारमध्ये सामील करून घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ७० हजार कोटींचा घोटाळा पचवला आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ हजार कोटींचा घोटाळाही पचवला असा आरोप या पत्राद्वारे शालिनीताई पाटील यांनी केला आहे.(Dhananjay munde)

यासोबतच “मी वारंवार याचा पाठपुरावा करत असूनही याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे आता मी उच्चस्तरीय वकील नेमून त्यांच्या विरोधात जोरदार लढाई लढणार आहे. भारतीय जनता पक्षाला ‘भारतीय’ हे नावही वापरता येणार नाही. कारण तो त्यांचा अधिकारच नाही. असे आरोप शालिनी पाटील यांनी केले असून, याविषयीही मी याचिका दाखल करून जोरदार लढाई लढणार आहे त्यांचं जे आधी ‘जनसंघ’ हे नाव होत तेच त्यांनी ठेवावं” असं या पत्रात त्यांनी नमूद केले आहे.(Dhananjay munde)

CM Eknath Shinde | ….मग श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही हे सिद्ध करा

Dhananjay munde | धनंजय मुंडे घरात नर्तकी… 

अजित पवारांसोबतच त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. “आज मी राज्यातील काही प्रमुख नेत्यांना आज पत्र लिहिले आहे. लवकरच मी देशातीलही सर्व नेत्यांना लिहिणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक घोटाळे व  गंभीर आरोपी असलेले मंत्र्यांचा समवेश आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदनाचा घोटाळ्याचा आरोप आहे. तर, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही अनेक आरोप आहेत. “धनंजय मुंडे हे बाहेरून नर्तकी आणतात आणि १०० लोकांना जमवून ते घरात नर्तकीचे कार्यक्रम ठेवतात” असा अत्यंत गंभीर आरोप शालिनीताई पाटील यांनी मुंडेंवर केला आहे.(Dhananjay munde)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!