Skip to content

CM Eknath Shinde | ….मग श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही हे सिद्ध करा

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde |  काल राज्याच्या राजकारणातील बहू प्रतीक्षित, ऐतिहासिक असा महानिकाल जाहीर झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या निकालाचे वाचन केले. दरम्यान, यानंतर शिंदे गटाने “सत्याचा विजय झाला, खरी सेना कोणाची ते सिद्ध झाले”. अशा प्रतिक्रिया दिल्या. तर, दुसरीकडे ठाकरे गटाने “आम्हाला हा निकाल मान्य नसून, सुप्रीम कोर्टात न्याय मागू” अशा प्रतिक्रिया दिल्या. हा निकाल जाहीर होण्याआधीच ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.(CM Eknath Shinde)

दरम्यान, या निकालाच्या वाचनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “घराणेशाही मोडीत निघाली” अशी टीका केली होती. तर, शिंदे यांच्या या टिकेला प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ” हा घराणेशाहीचा अंत असं म्हणवतात तर, मग श्रीकांत शिंदे हा त्यांचा मुलगा नाही हे त्यांनी सिद्ध करावे. बाळसाहेबांची आणि यशवंतराव चव्हाणांची कधीही घराणेशाही नव्हती” या शब्दांत संजय राऊत यांनी शिंदेंना प्रत्युत्तर दिलेले आहे.

CM Eknath Shinde | विरोधी पक्षांचे अवसान गळाले; मुख्यमंत्र्यांनी सर्वांनाच घेरले

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे डरपोक…  

पुढे खा. संजय राऊत म्हणाले की, “घराणेशाही अंत म्हणतात तर मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही  हे सिद्ध करा. सुरुवातीला मतदार संघात माझा मुलगा म्हणून मतं मागितली ना, मग श्रीकांत  शिंदे तुमचा मुलगा नाही का?  बाळासाहेब ठाकरे आणि यशवंराव चव्हाणांची घराणेशाही नव्हती. आंबेडकरांची काय घराणेशाही आहे का? त्यांचे विचार घेऊन लोक पुढे चालत आहेत. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र लुटणाऱ्यांचे पुरस्कर्ते होते. तुम्ही डरपोक आहात तुम्ही घाबरुन पक्ष सोडला हे मान्य करावे” अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. (CM Eknath Shinde)

CM Eknath Shinde | अपघातग्रस्तांसाठी मुख्यमंत्री बनले देवदूत; वाचवले तरुणाचे प्राण

नार्वेकर हे शिंदेंचे वकिल 

यावली कालच्या निकालाबाबत संजय राऊत म्हणाले की, “कालचा निकाल हा काही भाजपचे राज्यातील सध्याचे पुढारी आणि विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी ‘मॅच फिक्सिंग’ करुन घेतलेला निकाल दिला आहे. योग्य न्याय देण्याची जबाबदारी असणाऱ्या अध्यक्ष नार्वेकरांनी शिंदे गटाचे वकिल म्हणून काम केलं आहे. अॅड. नार्वेकर हे काल फक्त शिंदेंचे निकाल पत्र वाचत होते. एका बेईमान, चोर, लफंगे, आणि पाकिटमारांच्या निकालाचे ते वाचन करत होते.

याबाबत प्रत्येक पुरावा हा त्यांच्यासमोर तसेच सुप्रीम कोर्टसमोर ठेवलेला आहे. सुप्रीम कोर्टाने भरत गोगावलेंची प्रतोदपदी नेमणूक ही चुकीचे आहे असे सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयाला खोटं ठरवण्याचा प्रकार हा काल भाजपने केला. त्यामुळे या निकालाविरोधात आम्ही दाद मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की, सत्य आणि न्यायाचाच विजय होईल. शिवसेना अशा कित्येक संकटातून उजळून निघालेली आहे, असा विश्वासही यावेळी खा. राऊत यांनी व्यक्त केला. (CM Eknath Shinde)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!