PM Modi | मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गांत ‘मोठे’ बदल

0
5
PM Modi
PM Modi

PM Modi |  १२ जानेवारी रोजी म्हणजेच उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. शहरात होणाऱ्या ‘२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवा’ च्या निमित्ताने उद्या पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये दाखल होणार आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी झालेली आहे. नाशिक पोलिसांनी कालच मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मनाई आदेश लागू केलेत. दरम्यान, आता शहरातील अनेक प्रमुख वाहतूक मार्गातही काही बदल करण्यात आलेले आहेत. सभास्थळी येणाऱ्यांसाठी अनेक ठिकाणी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था उभारण्यात आलेली आहे. (PM Modi)

उद्या शहरात वाहतुकीसाठी काही प्रमुख रास्ते हे बंद करण्यात आलेले असून, या मार्गावरील वाहतूक ही पर्यायी मार्गांवरून वळवण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना नाशिक शहर पोलीस वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी जारी केलेली आहे. हे वाहतूक मार्गातील बदल उद्या सकाळी ६ वाजेपासून ते नियोजित सभा संपेपर्यंत असणार आहेत. (PM Modi)

PM Narendra Modi | मोदींचे नाशकात ‘शक्तिप्रदर्शन’; नेमकं पडद्यामागे चाललंय काय..?

PM Modi | हे मार्ग असणार बंद 

संतोष टी पॉईंट पासून ते  स्वामी नारायण चौकी

तपोवन चौफुली ते कार्यक्रमस्थळ

स्वामी नारायण चौक ते कार्यक्रमस्थळ

काट्या मारुती चौक ते संतोष टी पॉईंट

अमृतधाम चौफुली ते मिर्ची सिग्नल

‘जनार्दन स्वामी मठ’ टी पॉईंट ते तपोवन

लक्ष्मी नारायण मंदिर ते तपोवन

निलगिरी बाग पाट चौफुली ते तपोवन

बिडी कामगार पाट चौफुली ते निलगिरी बाग

नांदूरनाका ते तपोवन

रासबिहारी रोड ते निलगिरी बाग

तारवाला चौक ते अमृतधाम

दिंडोरी नाका ते काट्या मारुती चौक

टाकळी, काठे चौकाकडून सिदधीविनायक चौक मार्गे अमृतधाम

सिता गुफा मंदिर ते काळाराम मंदिर

काळाराम मंदिर ते नाग चौक मार्गे काट्या मारुती चौकी

सरदार चौक ते काळाराम मंदिर

मालेगाव स्टॅण्ड ते रामकुंड आमरगे गाडगे महाराज पुल (PM Modi)

PM Narendra Modi | काय सांगता ! पंतप्रधान मोदी होणार नाशिकचे खासदार ?

असे आहेत पर्यायी मार्ग

द्वारका उड्डाणपुलावरून ये-जा करता येणार आहे.

अमृतधाम, रासबिहारी मार्गे ये-जा करता येणार आहे.

अवजड वाहतूक – नांदूरनाका ते तपोवनकडील अवजड वाहतूक बिटको, नाशिकरोड, जेलरोड, जत्रा चौफुलीमार्गे

नाशिकरोड मार्गे मुंबईकडे जाणारी अवजड वाहने आता फेम सिग्नल, डीजीपी नगर, वडाळा गाव, कला नगर, पाथर्डी फाटा मार्गे मुंबई (PM Modi)

दिंडोरी, पेठरोडकडून येणारी वाहने आता पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, रविवार कारंजा, रामवाडी पुल यामार्गे


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here