Skip to content

Gold Silver Rate | आजच सोने खरेदी करा; असे आहेत आजचे दर

Gold Silver Rate Today

Gold Silver Rate | या आठवड्यात सोने-चांदिने लगातार ग्राहकांना ‘गुड न्यूज’ दिली आहे. या महिन्याच्या सुरुवातीचे दोन दिवस किंमतींमध्ये दरवाढ दिसून आली. त्यामुळे याही वर्षात सोन्याचे भाव आटोक्या बाहेरच राहणार का? हा प्रश्न ग्राहकांना पडला होता. आणि यचमुळे ग्राहकांचा हिरमोड झाला होता. मात्र, ३ जानेवारी पासून सोने आणि चांदीच्याही दरांमध्ये पडझडीचे सत्र सुरू झाले आणि किरकोळ वाढ वगळता अजूनही किंमतींमध्ये घसरण सुरूच आहे. (Gold Silver Rate)

दरम्यान, काल चांदीच्या किंमतींमध्ये काही प्रमाणात वाढ झाली होती. मात्र, आज त्यातही घसरण झाली आहे. तसेच मागील संत दिवसांत सोन्यात १,२०० रुपयांची तर चांदीच्या किंमतींमध्ये ३,१०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे हा महिना सामान्य खरेदीदारांसाठी मोठा आनंदाचा ठरला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दोन्ही धातूंच्या किंमती जास्त आहेत. डिसेंबर महिन्यात मौल्यवान धातूंनी दरवाढीचा नवीन उच्चांक गाठला होता. त्यानंतर या महिन्यात सलग ९ व्या दिवशीही सोन्याच्या किंमतींमध्ये घासरणीचे सत्र सुरू आहे. त्यामुळे जर, तुम्ही सोने किंवा चांदी खरेदीचा विचार करत असाल, तर आजचा दिवस हा यासाठी ‘उत्तम दिवस’ आहे.  (Gold Silver Rate)

Gold Rate Today | सोने घसरले तर चांदीची नांदी; असे आहेत सोने-चांदीचे दर

Gold Silver Rate | सोन्याचे उतरले भाव 

२०२४ या नव वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्याने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. तर, ३ जानेवारीपासून सोन्याच्या दरांमध्ये पडझड सुरू असून, पुढील प्रकारे दरांचा आलेख घसरल्याची नोंद आहे. दरम्यान, ४ जानेवारीला ४४० रुपयांची, ५ जानेवारी रोजी १३० रुपयांची घसरण नोंदवली गेली. तर, ६ जानेवारीला किरकोळ २० रुपयांची वाढ झाली होती. ८ जानेवारी रोजी पुन्हा २२० रुपयांनी, ९ जानेवारी रोजी १०० रुपयांनी दर खाली आदळले. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार, आज २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे  ६३,१०० रुपये आणि २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ५७,८५० रुपयांवर पोहोचले आहे. (Gold Silver Rate)

Gold Rate Today | सोने खरेदीची हीच उत्तम संधी; असे आहेत आजचे दर

चांदीत काल भर तर, आज घट 

या वर्षाच्या सुरुवातीला चांदीच्या किंमतीत घात सुरू असून, या ३ जानेवारीला चांदीचे दर हे तब्बल ३०० रुपयांनी तर, ४ जानेवारीला २००० रुपयांनी, आणि ८ जानेवारीला पुन्हा २०० रुपयांनी घसरण झाली. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार आज एक किलो चांदीचा दर हा ७६,००० रुपये इतका आहे.(Gold Silver Rate)

असा आहे १४ ते २४ कॅरेटचे दर 

आज पुन्हा सोने-चांदीच्या किंमतींमध्ये घसरण झाली. तर, इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, प्रति कॅरेट सोनेचे दर हे पुढीलप्रमाणे  आहेत…

२४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ६२,३४८ रुपये,

२३ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ६२,०९८ रुपये,

२२ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ५७,१११ रुपये,

१८ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ४६,७६१ रुपये,

तर, १४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ३६,४७४ रुपयांवर पोहोचले आहे.

चांदीचा (प्रति किलो) – ७१,४४७ रुपये असा आहे. (Gold Silver Rate)

(टीप – वरील माहिती ‘द पॉइंट नाऊ’ हे फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचत आहे. वरील दर हे सूचक असून, त्यात कुठल्याही करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधावा.) 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!