Skip to content

Gold Rate Today | सोने खरेदीची हीच उत्तम संधी; असे आहेत आजचे दर

Gold Silver Rate Today

Gold Rate Today |  गेल्या वर्षभर सन-चांदीचे दर हे चढेच राहिले. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळाला. मात्र, ऐन लग्नसराईत ग्राहकांचा हिरमोड झाला. वाढलेल्या भावांमुळे वधू पित्यांची चिंता वाढली होती. मात्र, हे वर्ष सोने खरेदी करू इच्छिणाऱ्या सामान्य ग्राहकांसाठी काहीसे आशादायी दिसत आहे. कारण, या वर्षाच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंच्या दरांमध्ये मोठी घसरण होत असल्याचे दिसत आहे. किरकोळ वाढ झाली असता, लेगच दुसऱ्या दिवशी दरांमध्ये पुन्हा पडझड होत असून, भावात पडझडीचे सत्र सुरू आहे. त्यामुळे आता सोने खरेदीचा हाच उत्तम मुहूर्त आहे. बघा असे आहेत आजचे सोने चांदीचे दर… (Gold Rate Today)

Gold Rate Today | सोने घसरले

गेल्या वर्षात सोन्याची विक्रमी आगेकूच सुरू होती. मात्र, यावर्षाच्या सुरुवातीला ३ जानेवारीपासून सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी पडझड सुरू झाली. तर, ४ जानेवारी रोजी पुन्हा किंमती ४४० रुपयांचीनी खाली आल्या. अनुक्रमे ५, आणि ८ जानेवारी रोजी सोन्याच्या भावात १३० आणि २२० रुपयांची घसरण झाली. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार आज २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर हा ५७,९५० रुपये आणि २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे  ३,२०० रुपये असे आहेत.(Gold Rate Today)

Gold Rate Today | सोने-चांदीत मोठी घसरण; असे आहेत आजचे दर

चांदीच्या दरांत अशी घसरण 

गेल्या वर्षभरात सोन्याच्या पाठोपाठ चांदीही चांगलीच झळाळली होती. दरम्यान, या वर्षात ३ जानेवारी रोजी सोन्यासोबत चांदीच्याही भावात ३०० रुपयांची घसरण झाली. तर, ४ जानेवारी रोजी चांदीचे दर तब्बल २००० रुपयांनी खाली आले. तसेच, ८ जानेवारी रोजी परत किंमतीत २०० रुपयांची घसरण झाली. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार आज एक किलो चांदीसाठी ७६,४०० रुपये मोजावे लागणार आहे.(Gold Rate Today)

Gold Rate Today | काल चढ तर, आज उतार; असे आहेत आजचे सोने-चांदीचे दर

असा आहे १४  ते २४ कॅरेटचा भाव 

आज सोन्याच्या किंमतीत पुन्हा मोठी घसरण झाली असून, बघा असे आहेत प्रति कॅरेटप्रमाणे सोन्याचे दर.. तर, इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, (Gold Rate Today) आज २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ६२,१९२ असे आहेत. तर, २३ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ६१,९४३ रुपये इतके आहेत. २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ५६,९६८ रुपयांवर पोहोचले आहे. तर, १८ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ४६,६४४ रुपये असून, १४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ३६,३८२ असे आहेत. दरम्यान, एक किलो चांदीचे दर हे आज ७१,३८६ रुपये झाले आहेत. (Gold Rate Today)

(वरील माहिती ‘द पॉइंट नाऊ’ फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहे. वरील दर हे सूचक आहेत त्यात करांचा समावेश नाही. त्यामुळे याद्वारे आम्ही कोणताही दावा करत नाही.)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!