Skip to content

Makar Sankranti | …आणि यामुळे मकर संक्रांतीला ‘पतंग’ उडवतात

Makar Sankranti

Makar Sankranti |  मकर संक्रांत हा इंग्रजी वर्षातील पहिला सण असतो. त्यामुळे हा सण भारतात वेगवेगळ्या रुपांत वेगवेगळ्या पद्धतीने पण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. “तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला” असे म्हणत आपण इंग्रजी नव वर्षाची उत्साही आणि सकरात्मक सुरुवात करतो. संक्रांतीला महिला काळ्या रंगाच्या साड्या आणि हळव्याचे दागिने घालून नटण्याची, पुरुष मंडळी तीळगूळाच्या लाडवांची आणि बच्चे कंपनी पतंग उडवण्याची आतुरतेने वाट बघत असतात. मात्र, मकर संक्रांतीला (Makar Sankranti) पतंग का उडवतात ?. हा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय ? चला तर मग जाणून घेऊयात की नेमकी मकर संक्रातीला पतंग का उडवतात. ही पद्धत कधी, कुठे आणि केव्हा सुरू झाली…

 Makar Sankranti | मकर संक्रांत म्हणजे काय..?

हिंदू धर्माच्या दिनदर्शिकेनुसार ‘मकर संक्रांती’ हा हिंदू वर्षातील शेवटचा महिना म्हणजेच पौष महिन्यातील शेवटचा सण असतो. पौष महिन्यातील या संक्रांत सणानंतर थंडी कमी होते आणि वसंत ऋतूला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) सण हा यावर्षी १५ जानेवारील रोजी आहे. दरम्यान, या दिवशी सूर्य हा धनु राशी सोडतो आणि मकर राशीमध्ये प्रवेश करतो. त्यामुळे सूर्याचे मकर राशीत संक्रमण होतो आणि याचमुळे याला ‘मकर संक्रांत’ असे म्हणतात.

Devmamledar | अन् एक सरकारी अधिकारी झाले बागलाणकरांचे ‘देव मामलेदार’

पतंग उडवण्यामागचे वैज्ञानिक कारण?

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचे वेध असते. १५ दिवस आधीपासूनच आकाशात ढगांपेक्षा पतंग उडताना दिसतात. मात्र, मकर संक्रांतीला पतंग उडवण्याचे नेमके कारण काय? चला तर मग जाणून घेऊयात यामागचे रहस्य…

संक्रांतीला पतंग उडवण्यामागे आरोग्य संपदेचे रहस्य दडलेले असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यप्रकाश हा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. ह्या दिवशीच्या सूर्यप्रकाशात मुबलक प्रमाणात ‘विटामीन – ई’ असते. डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे या दिवशीची सूर्यकिरणे ही आपल्यासाठी संजीवनी म्हणून काम करतात. या दिवाशीची सूर्यकिरणे ही अनेक अंजरांवरचे उपचार असतात. त्यामुळे या दिवशी आवर्जून पतंग उडवा आणि संक्रांतीच्या सूर्याचा सूर्यप्रकाश घ्या. (Makar Sankranti)

Datta Jayanti | पूर्वजांना मुक्त करणाऱ्या श्री दत्तांची आज जयंती; जाणून घ्या कथा

या आजारांवर रामबाण उपाय

हिवाळ्यात खोकला, सर्दी तसेच अन्य संसर्गजन्य आजारांचा धोका हा जास्त असतो. तसेच, या काळात सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे त्वचेचे आजारही उद्भवतात. दरम्यान, मकर संक्रांतीच्या दिवशीची सूर्य किरणे ही शरीरासाठी रामबाण औषध असतात. तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवल्याने आपले शरीर हे सूर्याच्या किरणांत राहते आणि याचा शरीराला अनेक पद्धतीने फायदा होतो. (Makar Sankranti)

अशी सुरू झाली पंतग उडवण्याची परंपरा..? 

हिंदू धर्मात मान्यतेनुसार, त्रेतायुगात एका मकर संक्रांतीच्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांनी आपले भाऊ आणि हनुमानासोबत पतंग उडवले होते. दरम्यान, तेव्हापासूनच या मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडविण्याची ही अनोखी परंपरा सुरू झाली. तर, या दिवशी स्नान, पूजा तसेच दान यांचे हिंदू धर्मात अनन्य साधरण महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, यावेळी मकर संक्रांत ही रुहानी नक्षत्रात सुरू होणार आहे. रुहानी नक्षत्र हे अतिशय शुभ नक्षत्र  मानले जाते. तसेच, याशिवाय या दिवशी ब्रह्मयोग तसेच आनंदादी योग हे देखील तयार होणार आहेत.

(वरील माहिती ‘द पॉइंट नाऊ’ हे फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून, याद्वारे आम्ही कोणताही दावा करत नाही किंवा अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!