Skip to content

Horoscope 9 January | ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जोडीदाराची साथ; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope 12 january

Horoscope 9 January |  ज्योतिषशास्त्रानुसार आणि ग्रहांच्या स्थितीनुसार असे आहे पुढील बारा राशीच्या लोकांचे आजचे राशीभविष्य. आज काही राशीच्या लोकांचा आर्थिक फायदा होऊ शकतो. तर, काही लोकांचे अडकलेले पैसे आज त्यांना परत मिळू शकतात. तर, काही लोकांना आज त्यांच्या जोडीदाराची काहमबीर साठ मिळेले आणि त्यांचे काही प्रलंबित प्राशनही मार्गी लागतील. तर जाणून घ्या पुढीलप्रकारे आहे १२ राशींचे आजचे राशी भविष्य…

मेष राशी – 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत आनंददायी असेल. आज तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ शकते त्यामुळे आजचा दिवस हा तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला आणि आनंदाचा असेल. विद्यार्थ्यांनाही आज शिक्षणाच्या बाबतीत चांगली बातमी मिळू शकते. मालमत्तेची खरेदी विक्रीचा व्यवहार प्रलंबित असतील. तर, ते व्यवहार आज मार्गी लागू शकतील. व्यवसायिकांनी त्यांच्या व्यवसायासाठी आखलेल्या काही इच्छित योजनाही आज पूर्ण होऊ शकतात. आर्थिक भरभराटीचा आजचा दिवस आहे. फक्त आज कौटुंबिक निर्णय घेताना जरा काळजीपूर्वक घ्यावेत.

वृषभ राशी – 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. व्यवसायिकांनी तुमच्या व्यवसायाशी संबंधित निर्णय घेताना आज तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचा सल्ला घ्या. आज जर कुठला आर्थिक व्यवहार करत असाल तर, सवधगिरी बाळगूनच करा. आज तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याची योजना आखू शकता. नोकरदार वर्गाने आज कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून जरा सावधगिरी बाळगावी. काही लोकांना आज सरकारी योजनांचा लाभ होऊ शकतो. तर, तरुणांना नोकरीच्या नवीन संधीदेखील उपलब्ध होऊ शकतात. (Horoscope 9 January)

Horoscope 7 January | ‘या’ लोकांनी आज संयम बाळगावा; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

मिथुन राशी – 

आजचा दिवस हा मिथुन राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर, तो आज घ्यावा.  नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी आज चांगल्या संधी चालून येण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाशी संबंधित काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, आज कामानिमित्ताने बाहेरही जावे लागू शकते. आज पैशाची बचत करण्यात तुम्हाला यश मिळेल. यासोबतच, आज कुटुंबीयांसोबतही बाहेर फिरायला जाण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराचे आज तुम्हाला चांगले सहकारी मिळेल. तर, विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा ऊर्जादायी असेल.

कर्क राशी – 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अतिशय सकारात्मक स्वरूपाचा असेल. व्यवसायिकांना आज त्यांच्या व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. व्यवसायाशी संबंधित नवीन काही योजना तयार करत असाल तर, त्यात तुम्हाला चांगले यश मिळू शकते. कुटुंबासोबत आज आनंदाचे क्षण जगता येतील. तुम्हाला आज तुमच्या मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. आरोग्याच्या समस्यांशी त्रस्त असाल तर, तुम्हाला आज त्यातून आराम मिळेल. जून मित्र भेटतील त्यांच्यासोबत आज वेळ घालवता येईल. (Horoscope 9 January)

सिंह राशी – 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला असेल. आज भेटलेल्या काही लोकांचा तुम्हाला पुढे फायदा होईल. व्यावसायिकांना आज व्यवसायाबाबत आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, व्यवसायाच्या विस्ताराबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबात काही वाद किंवा मतभेद असतील तर, आज त्या समस्यांवर तोडगा काढण्यात तुम्हाला यश मिळेल. वैवाहिक आयुष्यात आज तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळू शकते. कुटुंबासोबत सहलीचे नियोजन होऊ शकते.

Horoscope 5 January | ‘या’ राशीच्या लोकांची आज भरभराट; वाचा आजचे राशीभविष्य

कन्या राशी – 

आजचा दिवस हा कन्या राशीच्या लोकांसाठी भाग्याचा दिवस ठरणार आहे. तरुण आज स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ शकतात. आज तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो. व्यावसायिकांचे आज काही आज काही महत्त्वाचे व्यवसायाशी निगडीत व्यवहार होऊ शकतात. वैवाहिक आयुष्यात आज तुम्हाला महत्त्वाच्या निर्णयामध्ये जोडीदाराची साथ मिळेल. आज तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळीदेखील भेट देऊ शकतात. नोकरदार वर्गाला आज त्यांच्या कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल हा आज त्यांच्या बाजूने लागू शकतो. मात्र, महिलांना आज काम करताना काळजी घेण्याची गरज आहे. (Horoscope 9 January)

Horoscope 9 January | तूळ राशी – 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा फायद्याचा ठरणार आहे. आज कुठलाही निर्णय घेताना तुम्ही ठाम राहायला हवे. तसेच तुमच्या निर्णय क्षमतेतही स्पष्टता असयाला हवी. तुमच्या मुलांकडून आज तुम्हाला आनंदाची बातमी मिळू शकते. मुलांमुळे आज तुमची मान उंचावेल. तरुणांच्या प्रलंबित काही योजना आज मार्गी लागतील. कोणताही निर्णय घेताना आज तुम्ही अधिक विचार करणे टाळा. पैसे जपून खर्च करा. कुटुंबासोबत वेळ घालवता येईल.

वृश्चिक राशी – 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आनंदी असेल. कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळतील आणि त्या तुम्ही योग्यरित्या पार पाडाल. त्यामुळे आज वरिष्ठांसोबत तुमचे नाते आणखी सुधारेल आणि कार्यक्षेत्रात तुमचा मान वाढेल. या कामात तुम्हाला तुमच्या सहकरेंचे विशेष सहकार्य मिळेल. कुटुंबातही काही शुभ कार्याची बातमी मिळू शकते. आरोग्याच्या बाबतही आजचा दिवस हा तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. आर्थिक गुंतवणूक करण्याचाही विचार करू शकतात. (Horoscope 9 January)

धनु राशी – 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा उत्तम ठरेल. तरुणांना आज नोकरीशी संबंधित काही आनंदाची बातमी मिळू शकते. वैवाहिक आयुष्यात आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून एक खास भेट मिळू शकते. काही प्रशासकीय क्षेत्राशी संबंधित लोक हे आज त्यांच्या कामात चांगली प्रगती करण्याची शक्यता आहे. तसेच आज तुम्हाला काही आर्थिक लाभही होण्याची शक्यता आहे. आज नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली नोकरीची संधीही मिळू शकते. तर, राजकीय क्षेत्राशी संबंधित लोकांना आज समाजात मोठा सन्मान मिळेल.

मकर राशी – 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अतिशय चांगला असेल. नोकरदार वर्गाला आज कामात चांगले यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला तुमच्या कल्पकतेचा चांगला फायदा होऊ शकतो. तसेच आज तुम्हाला आर्थिक फायदाही होऊ शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्यांना आज मोठ्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते. तर, आज तुम्हाला तुमच्या काही प्रलंबित कामात तुमच्या मित्रांकडून मोठे सहकार्य मिळेल. तंत्रज्ञान तसेच संवादाशी संबंधित व्यक्तींना काही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.(Horoscope 9 January)

Horoscope Today 27 December:या राशीच्या लोकांनी प्रवास टाळावा, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

कुंभ राशी – 

आजचा दिवस हा कुंभ राशीच्या लोकांसाठी आनंदाचा दिवस असेल. हे लोक आज धार्मिक कार्यात अतिशय उत्साहाने सहभागी होतील. विद्यार्थ्यांना आज काही स्पर्धांमध्ये किंवा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी त्यांना नेहमीपेक्षा जास्त कष्ट घ्यावे लागतील. तर, सरकारी क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचे चांगले सहकार्य मिळेल. यामुळे त्यांचे काही मोठे प्रकल्पदेखील पूर्ण होतील. वैवाहिक जीवन हे आनंदी असेल. नोकरीच्या शोधत असलेल्यांना चांगली नोकरी मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीद्वारे काही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, आज कुठलाही निर्णय घेताना तुमचा रागीट स्वभाव टाळावा.

मीन राशी – 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अनुकूल असेल. नोकरदार वर्गाचे तुमच्या कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. माध्यमे तसेच जनसंवाद या क्षेत्राशी संबंधित लोकांना आज त्यांच्या कामासाठी विशेष प्रसिद्धी मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने आज तुम्हाला आजारांपासून मुक्ती मिळेल. तुमचे कौटुंबिक जीवन हे आज आनंदी असेल. कामानिमित्ताने आज तुम्हाला बाहेर जावे लागू शकते. वैवाहिक आयुष्यात आज काही नवविवाहित जोडपे बाहेर जाण्याचा बेत आखतील. (Horoscope 9 January)

(वरील माहिती ‘द पॉइंट नाऊ’ हे फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून, याद्वारे आम्ही कोणताही दावा करत नाही किंवा अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!