Sanjay Raut | आरोप करणे त्यांचा ‘धंदा’; संजय राऊतांना मेंटल हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज

0
4
Sanjay Raut
Sanjay Raut

Sanjay Raut | आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आले होते. उद्धव ठाकरे हे येत्या २२ जानेवारी रोजी नाशिकमध्ये येणार असून, यावेळी ते नाशिकमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा नारळही फोडणार आहेत. दरम्यान, याच सर्व नियोजनाच्या पाहणीसाठी खासदार संजय राऊत हे आज नाशिकमध्ये आलेले होते. यानंतर ते शिर्डी येथे गेले असता, मध्यमांसोबत बोलताना त्यांनी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली होती. (Sanjay Raut)

महसूल नव्हे तर आमसूल मंत्री

यावेळी ते म्हणाले की, “विखे पाटील हे महसूल नव्हे तर आमसूल मंत्री” या शब्दात विखे पाटील यांच्यावर खोचक टीका संजय राऊतांनी केली होती. दरम्यान, आता राऊतांच्या या टीकेला विखे पाटीलांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी संयमी विखे पाटलांचा संयम ढासळल्याचे दिसून आले. संजय राऊतांना थेट मेंटल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याची गरज असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. (Sanjay Raut)

Sanjay Raut | “संजय राऊत चुXX झालाय”; राज्यात पुन्हा शिव्यांचे राजकारण

विखे पाटलांच्याच शिर्डीतून खासदार संजय राऊतांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. यावेळी “महानंदा डेअरी ही महाराष्ट्र राज्याचीच आहे आणि ती येथेच राहिली पाहिजे” असे म्हणत लवासाबद्दल श्वेत पत्रिका काढायला सांगणारे हे राधाकृष्ण विखे पाटील “महसूल मंत्री नाहीतर आमसूल मंत्री आहेत” अशी बोचरी टीका संजय राऊतांनी केली होती. (Sanjay Raut)

दरम्यान, आता याला प्रत्युत्तर देत राधाकृष्ण विखे पाटील यांनी ” खासदार संजय राऊत यांना लवकरात लवकर मेंटल हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे. संजय राऊतांनी कित्येक लोकांच्या प्रपंचात हस्तक्षेप करून देशोधडीला लावले आहेत. त्यांची यादी आता मी जाहीर करेल, मी आत्तापर्यंत जाऊ द्या जाऊ द्या म्हणत सोडून देत आलो. मात्र, त्यांनी काहीतरी पथ्य पाळले पाहिजे. आणि आता वेळ आली आहे” यावेळी संयमी नेते अशी ख्याती असलेल्या विखे पाटलांचा संयम सुटला आणि त्यांनी या शब्दांत राऊत यांना खडे बोल सुनावले आहे. (Sanjay Raut)

sanjay raut| अजित पवारांना कोणता मच्छर असा अचानक चावला याचा तपास झाला पाहिजे- खा. राऊत

Sanjay Raut | त्यांचा आरोप करण्याचा धंदाच

महाराष्ट्रातील महानंदा दूध डेअरी ही गुजरात राज्यात नेणार असल्याची केवळ चर्चा आहे. दरम्यान, या बाबत अद्यापही कुठलंही अधिकृत दुजोरा नाही. या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून जे हे सर्व आरोप करत आहेत. हा त्यांचा आरोप करण्याचा धंदाच आहे. तेथे यांच्या ठाकरे सेनेची युनियनच आहे. तसेच या सेनेचे अध्यक्ष हे ठाकरे सेनेचेच आमदार आहेत. त्यांनीच या आरोप करणाऱ्यांना जाऊन सांगितले आहे की, आरोप करण्यात कुठलेही तथ्य नाही. त्यामुळे महानंदावर डेअरीवर करण्यात आलेले आरोप हे अतिशय बिनबुडाचे असल्याचे स्पष्टीकरण यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. (Sanjay Raut)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here