Gold Rate Today | सोने-चांदीत मोठी घसरण; असे आहेत आजचे दर

0
3
Gold Rate Today
Gold Rate Today

Gold Rate Today | या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात सोने चांदीच्या किंमतींमध्ये मोठे चढउतार होताना दिसले. सुरुवातीला किंमतीतींनी मोठी मुसंडी घेतली. मात्र, त्यानंतर दरांमध्ये पंजाड झाल्याचे दिसून आले. गेल्या वर्षात एन दसरा-दिवाळीपासूनच सोन्याने आगेकूच सुरू ठेवली होती. त्यानंतर किंमतींनी विक्रम रचले. सोन्याच्या किंमती या जवळपास ६६ हजारांच्या पार गेल्या होत्या. त्यानंतर आता नवीन वर्षात तरी किंमती आटोक्यात राहतील अशी ग्राहकांना आशा होती. सुरुवातीला किंमतींमध्ये वाढ दिसून आली. मात्र, आता पुन्हा घसरण झाल्याचे दिसत आहे. तर, असे आहेत आजचे सोने-चांदीचे दर… (Gold Rate Today)

असे झाले चढउतार 

गेल्या वर्षाच्या शेवटच्या दिवसांत सोन्याच्या किंमतींनी दरवाढीचे सर्व विक्रम मोडले. तब्बल ६६ हजारांच्या घरात भाव पोहोचले होते. या वर्षाच्या सुरुवातीच्या दिवसांत सोन्यात अनुक्रमे पुढीलप्रमाणे वाढ झाली. २ जानेवारीला सोन्याच्या किंमतीत पुन्हा २७० रुपयांची वाढ झाली. मात्र, दुसऱ्या दिवशी सोन्यात जितकी वाढ झाली होती तितकीच घसरण झाली. नंतर पुन्हा ४ जानेवारी रोजी किंमती ४४० रुपयांनी घसरल्या. तर, ५ जानेवारी रोजी सोन्यात १३० रुपयांनी घसरले आणि काल किंमतींमध्ये किरकोळ वाढ झाली.  दरम्यान, आज २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव हा ६२,७१० रुपयांवर पोहोचला आहे. (Gold Rate Today)

Gold Rate Today | चांदीचीही माघार 

मागील वर्षात सोन्याच्या सोबतच चंदिही तेजीत होती. मात्र, यामुळे चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना गेल्या वर्षात चांदिने चांगला परतावा दिला. दरम्यान, आता या वर्षाच्या सुरुवातीला चांदितही घसरण होताना दिसत आहे. २ जानेवारी रोजी चांदीच्या किंमती ३०० रुपयांनी वधारल्या होत्या. तर, दुसऱ्या दिवशी पुन्हा दर तितकेच घसरले. ४ जानेवारी रोजी किंमती पुन्हा २००० रुपयांनी खाली आल्या. तर, आज एक किलो चांदीचे दर हे ७६,६०० रुपये इतके आहे.(Gold Rate Today)

२४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ही आज ६२,७१० रुपये अशी आहे. मागील ट्रेडमध्ये या मौल्यवान धातूचे भाव हे ६२,७८० रुपयांवर थांबले होते. तर, बुलियन मार्केटनुसार, आज चांदीचे दर हे ७२,४६० रुपये प्रति किलो असे आहेत. तर, मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ही ७२,६५० रुपये प्रतिकिलो अशी होती.(Gold Rate Today)

(वरील माहिती ही ‘द पॉइंट नाऊ’ फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून, वरील दर हे सूचक आहेत. त्यात कुठल्याही करांचा समावेश नाही अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलर्ससोबत संपर्क साधावा.)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here