Shivsena | जे सुप्रीम कोर्टाला अमान्य ते सारे नार्वेकरांच्या कोर्टात मान्य

0
2
Shivsena
Shivsena

Shivsena |  तब्बल एक वर्ष आणि ८ महीन्यांपासून ढकलत ढकलत सुरू असलेली शिवसेना (Shivsena) आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी ही आज अखेर मार्गी लागली. जसा निकाल तयार करण्यासाठी उशीर केला. तिच प्रथा विधानसभा अध्यक्षांनी आज निकाल वाचण्यासाठीही सुरू ठेवली. निकाल वाचनाची वेळ ही दुपारी ४.३० वाजताची देण्यात आली होती. मात्र, राहुल नार्वेकर हे सभागृहात ५ वाजता दाखल झाले. त्यानंतर त्यांनी या  निकालाच्या वाचनाला सुरुवात केली.

दरम्यान, यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या १६ आमदारांना पात्र ठरवले आणि शिंदे गटालाच खरी शिवसेना असल्याचा मान दिला. मात्र, हा निकाल सुनावताना जे जे सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केले होते. ते सर्व विधानसभा अध्यक्षांच्या न्यायालयात मान्य करण्यात आले आहे. (Shivsena)

Shivsena Result | आमदार अपात्रता निकाल; शिंदे सेनाच खरी शिवसेना

तर, यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी खरी शिवसेना कोणाची?, या प्रकरणाचा निकाल लावला. यात पक्षाची घटना, नेतृत्वाची रचना आणि विधिमंडळ पक्ष तसेच बहुमत या बाबी गृहीत धरण्यात आल्यात. निवडणूक आयोगाकडे असलेली शिवसेना पक्षाची घटना मान्य करण्यात आली. २०१८ मध्ये करण्यात आलेले शिवसेनेच्या घटनेतील बदल हे निवडणूक आयोगाकडे असलेल्या घटनेत न आढळल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

Shivsena | सुप्रीम कोर्टाला काय अमान्य..?

१. सर्वोच्च न्यायालयाने राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना काही निर्देश केले होते. त्यानुसार गुवाहाटीत शिंदे गटाने प्रतोद पदावर आमदार भरत गोगावलेंची केलेली नियुक्ती सुप्रीम कोर्टाने अवैध ठरवली होती. तर, भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर असून, अधिकृत व्हिप कोण हे जाणून घेण्याचा प्रयत्न व झाल्याचेही म्हटले होते.

२. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाने विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची केलेली नियुक्ती हीदेखील आपल्या निकालात अवैध ठरवली होती.

३. आमदार अपात्रतेपासून वाचण्यासाठी आम्हीच खरा पक्ष असल्याच्या पळवाटा असून, कुठलाही गट हा थेट कुठल्याही पक्षावर दावा करु शकत नसल्याचेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले होते. (Shivsena)

Shivsena | मोठी बातमी..! पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता मिळणार ?

नार्वेकरांना सगळेच मान्य 

१. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार भरत गोगवले यांची शिवसेना पक्षाच्या परतोड पदावर केलेली नियुक्ती वैध ठरवली आहे.

२. शिंदेंसोबत पहिल्या टप्प्यात गेलेल्या १६ आमदारांवर ठाकरे गटाने अपात्रतेचा दावा केला होता. त्या १६ ही आमदारांना पात्र ठरवले.

३. कुठल्याही नेत्याला पक्षाच्या पदावरून हटवण्याचा निर्णय हा फक्त पक्षप्रमुख घेऊ शकत नाही, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंची गटनेते पदावरील हकालपट्टी अवैध ठरवली.

४. तसेच बहुमत, पक्ष रचना बघत शिवसेना शिंदे गटालाच वैध ठरवले असून, ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला.(Shivsena)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here