Skip to content

Shivsena Result | आमदार अपात्रता निकाल; शिंदे सेनाच खरी शिवसेना

Shivsena Result

Shivsena Result | आज देशासह संपूर्ण राज्याचे लक्ष ज्या ऐतिहासिक निकालाकडे लागले होते. तो निकाल अखेर जाहीर झालेला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल वाचला आहे. हा देशाच्या राजकारणातील महानिकाल आहे. दरम्यान, आज सकाळपासूनच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांचे आरोप करण्यात येत होते. त्यानंतर दुपारी ४.३० वाजेची वेळ देऊन राहुल नार्वेकर हे अर्धा तास उलटल्या नंतरही निकाल वाचण्यासाठी आले नाही. दरम्यान, या बंद दाराआडच्या चर्चेमुळे अर्धा तास मोठा सस्पेन्स तयार झाला होता. अखेर शिंदे आणि ठाकरे यांच्यातील १ वर्ष आणि ८ महीने चालू असलेल्या युद्धाचा आज निकाल लागला.(Shivsena Result)

दरम्यान, यावेळी निकाल वाचनाच्या सुरुवातीलाच राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. उद्धव ठाकरे गटाने दाखल केले २०१८ मधील शिवसेनेची घटना त्यांनी अमान्य केली असून, शिवसेनेची १९९९ सालची घटना त्यांनी गृहीत धरत हा निर्णय सूनवण्यास सुरुवात केली. (Shivsena Result)

Shivsena | मोठी बातमी..! पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता मिळणार ?

Shivsena Result | पक्षप्रमुखांचा निर्णय अंतिम नाही 

दरम्यान, शिवसेनेच्या या घटनेनुसार पक्षप्रमुखांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. या ठाकरेंच्या दाव्याला त्यांनी फेटाळले आहे. तसेच, यावेळी फक्त शिवसेना पक्षप्रमुख हे एकटे पक्षाचा निर्णय घेऊ शकत नाही. शिवसेनेच्या घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकरिणीचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची  पक्षाच्या गटनेते पदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय हा एकटे उद्धव ठाकरे घेऊ शकत नाही हे राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केले आहे.

हा निर्णय सुनावताना ते सुरुवातीला म्हणाले की, खरी शिवसेना कोणती आणि व्हीप कोण? हा प्रश्न होता. घटना, नेतृत्व आणि विधिमंडळ बहुमत हे ३ घटक पक्ष ठरवताना महत्त्वाचे असतात. नेते आणि पदांची रचना आणि शेवसेनेच्या घटनेवरूनच खरी शिवसेना कोणती हे कळेल. तसेच, उलट तपासणीला उद्धव ठाकरे आले नाहीत, म्हणून ठाकरेंचे प्रतिज्ञापत्र देखील विधनसभा अध्यक्षांनी रद्द केले आहे. (Shivsena Result)

Shivsena | शिंदे अपात्र ठरल्यास; ‘हे’ होणार राज्याचे नवे मुख्यमंत्री?

शिंदे सेनाच खरी शिवसेना 

पक्षात बंड झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख या नात्याने नेता आपला आदेश हा पक्षाचा आदेश घोषित करू शकतो. मात्र, जर पक्षातील इतर नेत्यांनी पक्षाच्या घटनेच्या आधारावर एखादा नवा नेता हा पक्षप्रमुख म्हणून निवडला असेल तर त्याचाच दावा हा घटनेनुसार अधिकृत मानला जाईल. असे महत्तवाचे विधान यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले. तसेच, राहुल नार्वेकर यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांच्या १६ आमदारांना पात्र ठरवले असून, विधिमंडळात ज्या पक्षाचे बहुमत आहे. तोच पक्ष खरा पक्ष असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना घोषित केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!