PM Narendra Modi | काय सांगता ! पंतप्रधान मोदी होणार नाशिकचे खासदार ?

0
6
PM Narendra Modi
PM Narendra Modi

PM Narendra Modi | देशात निवडणुकांचे पडघम वाजायला सुरवात झाली असून, त्या दृष्टीने हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. येत्या फेब्रुवारी महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष मैदानात उतरला आहे. उत्तर प्रदेश नंतर सर्वाधिक लोकसभेच्या जागा या महाराष्ट्रात येतात. यामुळे केंद्रात सत्ता मिळवायची असल्यास महाराष्ट्र हा सत्तेचा ‘राजमार्ग’ असणार आहे. नुकतेच झालेल्या सर्वे मध्ये महाविकास आघाडीची पकड मजबूत दिसत आहे. तर युतीचा मार्ग जरा खडतर आहे. यावर उपाय म्हणुन भाजपा तर्फे धक्कादायक निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.(PM Narendra Modi)

गेल्या वर्षभराचा विचार केल्यास राज्यात केंद्रीय नेत्यांचे दौरे जरा जास्तच वाढले आहेत. त्यात स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तब्बल ६ दौरे यावर्षात झाले आहेत. तर, त्यासोबतच गृहमंत्री अमित शहा, जे. पी. नड्डा यांचेही अनेक दौरे झाले आहेत. यामागे भाजपची नक्कीच वेगळी व्यूहरचना असण्याची शक्यता आहे.

सध्या देशात राम मंदिराच्या निमित्ताने हिंदुत्व प्रकर्षाने जाणवत आहे. भाजपातर्फे  या निमित्ताने गावागावात इव्हेंट केले जात असून, वातावरण निर्मिती प्रभावीपणे सुरू आहे. या दरम्यान सूत्रांकडून मोठी माहिती समोर येत आहे. सुत्रांवर विश्वास ठेवल्यास त्यांच्या म्हणण्यानुसार, आरएसएस आणि महाराष्ट्र भाजपाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाशिक लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी आग्रह केला जात आहे.(PM Narendra Modi)

PM Modi | मोदी नाशकात; काय आहे मोदींच्या ह्या दौऱ्यामागचे ‘गुपित’

निवडणुकीचा भाग म्हणुन भाजपाने गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहराकडे विशेष लक्ष देण्यास सुरवात केली आहे. युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड करून मोदींना नाशिक शहरात उद्घाटनासाठी बोलविणे हा त्याचाच भाग असल्याचे बोलले जात आहे. नाशिक दौऱ्यावर पंतप्रधान असताना काळाराम मंदिराला देखील ते भेट देणार असल्याची माहिती आहे.

नाशिक लोकसभा निवडणूक लढवल्यास श्रीरामांचे आयोध्या आणि नाशिकशी असलेले नाते देशभरात पोहचविण्यास मदत होईल. महाराष्ट्रात मोदी निवडणूक लढवणार म्हणून राज्यात त्यांचा प्रभाव पडेल आणि जागा वाढतील, हा भाजपचा प्लॅन असल्याची चर्चा आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला धोबीपछाड देण्यासाठी हा प्लॅन आखल्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात हे सर्व स्पष्ट होईलच, मात्र असे झाल्यास नाशिकचा मोठा कायापालट होईल आणि देशाच्या केंद्रस्थानी नाशिकचे नाव येणाऱ्या काळात गुंजत राहील यात काहीही शंका नाही.

अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाच्या आधी येत्या १२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये येणार असून, नाशिक जिल्हा प्रशासनासह सर्वच यंत्रणा या कार्यक्रमाच्या तयारीला लागली आहे.  युवा संमेलनाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान हे नाशिकमध्ये येणार आहेत. यावेळी ते आगामी निवडणुकांच्या प्राचाराचे नारळही फोडणार आहेत.(PM Narendra Modi)

मात्र, यामागे वेगळेच कारण असल्याची मोठी माहिती सूत्रांकडून समजली , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधून खासदारकी लढवावी अशी मागणी पक्ष अंतर्गत होत आहे. याआधी मोदी पुण्यातून निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. त्यातच आता नाशिकमधून मोदींनी निवडणूक लढवावी अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेकडून करण्यात येत असल्याची माहिती खात्रीशीर सुत्रांकडून मिळाली आहे.

PM Modi | पंतप्रधान मोदींचा आज शिर्डी दौरा; दुपारी अर्ध्या तासासाठी मंदिर बंद

PM Narendra Modi | का आहे शक्यता ?

आगामी निवडणुकांमध्ये भाजप हिंदुत्वाचा मुद्दा समोर ठेऊनच रणांगणात उतरणार असून, यासाठी आता अयोध्येतील राम मंदिराचा भाजपला मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर राज्यात एक महत्त्वाचे धार्मिक शहर म्हणजे ‘नाशिक’, याचमुळे प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या धार्मिक नगरीतून मोदींनी निवडणूक लढवावी अशी इच्छा पक्षातून व्यक्त केली जात आहे.(PM Narendra Modi)

नाशिकला धार्मिक दृष्ट्या विशेष महत्त्व आहे, येथे दर १२ वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, साडे तीन शक्ति पीठांपैकी एक सप्तशृंगी देवी, काळाराम मंदिर अशी अनेक धार्मिक दृष्ट्या महत्त्वाची असलेली धार्मिक स्थळे आहेत. एवढेच नाहीतर, प्रशासकीय शक्तीपीठ म्हणजेच नोटप्रेस, अर्टीलरी सेंटर, एचएएल, तसेच भारतीय सेना दलाचे एचआर विभागदेखील नाशिकमध्ये आहे, यामुळे नाशिक हे सर्वच बाबींत पुढारलेले शहर आहे.

Modi in loksabha: ‘मोदी तेरी कब्र खुदेगी’….., अन् पंतप्रधान संतापले

दरम्यान, या सर्व शक्यता पाहता मोदींचा नाशिकमधून निवडणूक लढवण्याचा मार्ग हा प्रतिकूल असून, ते येत्या १२ जानेवारी रोजी नाशिकमध्ये येणार आहेत. मोदी नेमक पुण्यातून की नाशिकमधून निवडणूक लढवणार? मोदींच्या नाशिक दौऱ्यामागे नेमके गुपित काय? हे सर्व प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. यामुळे आता नाशिकच्या राजकारणात कोणत्या मोठ्या घडामोडी घडतील. हे पाहणे आता मोठे औत्सुक्याचे असणार आहे. मात्र, मोदी नाशिकचे खासदार झाले तर, नाशिकला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होईल. आणि नाशिकचा विकास साधला जाईल.

याआधीही नाशिकला देश पातळीवर नेतृत्व करणारे एक नेतृत्व लाभले होते आणि ते म्हणजे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण.  १९६२ मध्ये यशवंतराव चव्हाणांनी नाशिकमधून निवडणूक लढवली होती. आणि नाशिककरांनीही त्यांना लोकसभेत नाशिकचे नेतृत्व करण्याची संधी दिली आणि याचीच परतफेड म्हणून त्यांनी नाशिकमध्ये एचएएल सारख्या अनेक औद्योगिक संस्था आणल्यात. (PM Narendra Modi)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here