Skip to content

Gold Price Today | नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोने महागले; असे आहेत आजचे दर

Gold Price Today

Gold Price Today |  नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोने चांदीचे दर हे अटोक्यात होते. पहिल्या दोन दिवसांत दरांमध्ये किरकोळ वाढ झाली होती. मात्र, दर हे स्थिर होते. त्यामुळे या नवीन वर्षात तरी किंमती स्थिर राहतील किंवा बेजटमध्ये राहतील. मात्र, पुन्हा सोने चांदीच्या किंमतीनणी ग्राहकांचा हिरमोड केला आहे. नवीन वर्षात आता पुन्हा किंमतींनी उसळी घेतली आहे. दरम्यान, चांदीही झळाळली आहे. दरम्यान, सोन्याच्या किंमते या लवकरच ६५ हजारांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. जाणून घ्या सध्या काय आहेत सोने-चांदीचे दर? (Gold Price Today)

Gold Silver Rate | नव वर्षाच्या सुरुवातीला असे आहेत सोने-चांदीचे दर

किंमतीत इतकी वाढ 

मागील वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याच्या किंमती या ७०० रुपयांनी वाढल्या आहेत. तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी किंमतींमध्ये ४०० रुपयांनी घसरण झाली. दरम्यान, नवीन वर्षात सोन्याचे दर हे पुन्हा झळाळले आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आज सोन्याच्या किंमतींमध्ये  २७० रुपयांची भर पडली आहे. आता २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ५८,९०० रुपये आणि २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ६४,२४० रुपयांवर पोहोचले आहेत. (Gold Price Today)

दरम्यान, मागील वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात चांदीच्या दरांमध्ये तब्बल १,२०० रुपयांची भर पडली. त्यानुसार, २९ डिसेंबर रोजी १२०० रुपयांनी दर खाली घसरले. मात्र, नवीन वर्षात आज चांदी पुन्हा महागली असून, ३ जानेवारी रोजी चांदीचे दर हे ३०० रुपयांनी वर सरकले आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आज एक किलो चांदीचे दर हे ७८,९०० रुपये असे आहेत. (Gold Price Today)

Gold Silver Rate | वर्षाअखेरीस असे आहेत सोने चांदीचे दर

Gold Price Today | असे आहेत १४ ते २४ कॅरेटचे दर..?

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, दरम्यान आज सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ झाली असून, प्रति कॅरेट प्रमाणे सोन्याचे दर हे पुढील प्रमाणे आहेत. २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने ६३,६०२ रुपये असे आहेत. २३ कॅरेट प्रति १० ग्रॅम ६३,३४७ रुपये झाले आहेत. तसेच २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ५८,२५९ रुपये इतके झाले आहेत. १८ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ४७,७०२ रुपये असे आहेत. १४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोण्याची किंमत ही ३७,२०७ रुपये असे आहेत. दरम्यान, एक किलो चांदीचा आजचा दर हा ७४,१३३ रुपयांवर पोहोचला आहे. (Gold Price Today)

(टीप – वरील महिती ‘द पॉइंट नाऊ’ हे फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून, याद्वारे आम्ही कुठलाही दावा करत नाही. अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधावा.)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!