Skip to content

Chhagan Bhujbal | येवल्यातून भुजबळांच्या विरोधात ‘हा’ नेता मैदानात उतरणार

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal |   येवला मतदार संघ हा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची राजधानी आहे. मात्र, आता याच मतदार संघातून छावा क्रांतीवीर संघटनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी भुजबळांच्या विरोधात मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. तसेच छावा क्रांतीवीर संघटना आता सक्रिय राजकारणात उतरणार असल्याचीही घोषणा संघटनेच्या १० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात गायकर यांनी केली.

अरम्यान, छावा क्रांतिवीर सेनेचा १० व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम हा त्र्यंबक रोडवरील सौभाग्य लॉन्स येथे पार पडला.  यावेळी राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील प्रमुख मान्यवर तसेच संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

काय म्हणाले करण गायकर..?

यावेळी छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर हे संबोधित करताना म्हटले की, येणाऱ्या काळात छावा क्रांतिवीर सेना ही सक्रिय राजकारणात उतरणार आहे. तसेच यावर्षात मराठा समाजाला विरोध करत असलेल्या छगन भुजबळ यांच्या लासलगाव-येवला मतदार संघातूनच निवडणूक लढणार असल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले.

Chhagan Bhujbal | ‘महाराष्ट्र सदन घोटाळा’ प्रकरणी भुजबळ पुन्हा अडकणार..?

मराठा आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्या छगन भुजबळांना त्यांची जागा दाखवण्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र यावे. तसेच सर्वसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी जोरदार आंदोलने करण्याचे तसेच सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच, जर कोणी छावा क्रांतिवीर सेनेला कमी लेखत असेल तर त्यांनी ही गर्दी बघावी असा इशारा यावेळी त्यांनी दिला. (Chhagan Bhujbal)

Chhagan Bhujbal | करण गायकर यांना आमचा पाठिंबा… 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील बागुल बोलताना म्हणाले की, जर करण गायकर हे मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या भुजबळांच्या विरोधात येवल्यातून निवडणूक लढणार असतील तर, आम्ही सर्व मराठा समाजाचे राजकीय नेते हे आमच्या पक्षीय विचारधारा बाजूला ठेवून करण गायकरांच्या पाठीशी उभे राहू. तसेच, त्यांना येवला मतदार संघामधून निवडून आणण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेल. त्यांना विजयी करणे हे महत्वाचे आहे.(Chhagan Bhujbal)

Chhagan Bhujbal | छगन भुजबळ यांची ‘ती’ केस मागे; भुजबळांना क्लीनचीट

छावा संघटनेच्या १० व्या वर्धापन दिनाच्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य कार्यकारणी, विभागीय कार्यकारणी, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख,महानगरप्रमुख,आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना उपनेते सुनील बागुल, आमदार हिरामण खोसकर, माजी महापौर दशरथ पाटील, मराठा नेते किशोर चव्हाण, गटनेते विलास अण्णा शिंदे, माजी नगरसेवक सतीश सोनवणे, मनसे जिल्हाप्रमुख सुदाम कोंबडे, माजी नगरसेविका इंदुमती नागरे, यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर हे यावेळी उपस्थित होते.(Chhagan Bhujbal)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!