Skip to content

Deola News | चिंचवे (निं) विकास सोसायटीच्या चेअरमन पदी विश्वास वाघ

Deola News

Deola News | सोमनाथ जगताप –  चिंचवे (निं) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी विश्वास बळीराम वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिंचवे (निं) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे तत्कालीन चेअरमन गणेश देवाजी गांगुर्डे यांनी आवर्तन पध्दतीने राजीनामा दिल्याने ह्या रिक्त पदासाठी मंगळवारी (दि. २) रोजी देवळा येथील सहायक निबंधक कार्यालयात अध्यासी अधिकारी ज्ञानेश्वर अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली होती.

Petrol Shortage | अखेर संप मागे; मात्र दोन दिवसांत राज्याला ५०० कोटींचा फटका

Deola News | चेअरमन पदी सर्वानुमते विश्वास वाघ यांची नियुक्ती

दरम्यान, यावेळी चिंचवे (निं) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी सर्वानुमते विश्वास वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सुचक म्हणून प्रकाश मुरलीधर पवार आणि अनुमोदक म्हणून सुभाष राबवा मोरे यांनी स्वाक्षरी केली असून याप्रसंगी चिंचवे (निं) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन गणेश देवाजी गांगुर्डे, व्हाईस चेअरमन रविंद्र फकिरा पवार, प्रकाश पवार, सतिश पवार, समाधान गांगुर्डे, भाऊराव पगारे, निंबा पवार, रामभाऊ पवार, वैजंता गायकवाड, लिलाबाई कदम, सचिन पवार, सुभाष मोरे, सचिव सुधाकर चव्हाण आदींसह इतर सभासद उपस्थित होते. तर वेगवेगळ्या स्तरातून नवनिर्वाचित चेअरमन विश्वास बळीराम वाघ यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!