Petrol Shortage | अखेर संप मागे; मात्र दोन दिवसांत राज्याला ५०० कोटींचा फटका

0
2
Petrol Shortage
Petrol Shortage

Petrol Shortage | गेल्या दोन दिवसांपासून राज्यासह संपुर्ण देशात ट्रक चालकांनी नविन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात संप पुकारलेला होता. दरम्यान, केंद्रीय गृहसचिवांशी झालेल्या चर्चेनंतर ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने ट्रक चालकांना त्यांचा देशभरातला संप मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच Hit and Run या प्रकरणातल्या कायद्यात नव्या तरतुदी तूर्तास लागू होणार नाहीत, असं आश्वासन केंद्रीय गृह विभागाकडून देण्यात आलेलं आहे.

तुर्ताच टँकरचालकांनी हो संप मागे घेतला असला तरीही अजूनही राज्यातील अनेक भागात पेट्रोल पंपावर मात्र नागरीकांची गर्दी तशाच परिस्थित दिसून येत आहे. यातच टँकरचालकांनी पुकारलेल्या संपाचे अनेक बाबींवर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. या संपामुळे राज्यातील बाजारपेठांमध्ये भाज्यांची आवक घटली आणि अशा अनेक कारणांमुळे राज्याला या संपामुळे ५०० कोटींचा फटका बसलेला आहे.

Mahayuti News | राज्यात प्रचंड मोठं यश महायुती मिळवणार! तिन्ही पक्षांचा मेगाप्लॅन समोर

महाराष्ट्रात मुंबईसह नाशिक शहरात आज पहाटेपासूनच पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनचालकांनी गर्दी केली असून ट्रान्सपोर्ट युनियनने जरी आपला संप मागे घेतला असला तरी राज्यातील अजूनही काही भागात काल दिवसभर पसरलेल्या गैरसमजामुळे पेट्रोल पंपांवर रांगा लागलेल्या दिसत आहेत. काही ठिकाणी पेट्रोलचा साठा संपल्याने पेट्रोल पंप बंद आहेत तर अनेक इंधन पुरवठा पुर्ववत करण्यात आला आहे. तसेच टँकरचालकांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम राज्यातील अनेक मुख्य बाजार समितींवर झाला असून भाजी मार्केटमध्ये येणाऱ्या गाड्यांची आवक घटली. या सर्व परिस्थितीमुळे भाजीपाला दरात 20 ते 25 टक्के वाढ झालेली आहे.

Big Breaking | ट्रॅंकर चालकांचा संप अखेर मागे; वाहनधारकांना मोठा दिलासा

Petrol Shortage | नाशिकचे जिल्हाधिकारी यांनी मनमाड येथे काढला तोडगा

नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्याशी चर्चा करून ट्रक चालकांच्या संपावर तोडगा काढण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी संबंधित प्रतिनिधींशी मनमाड येथे चर्चा करत तोडगा काढला असून हा संप मागे घेण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यातील मनमाड पानेवडी येथील इंधन प्रकल्पातील टँकर चालकांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला असून आज सकाळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दूरध्वनीवरून चर्चा करत जिल्हाधिकाऱ्यांना बैठक घेवून तोडगा काढण्याच्या सूचना केल्या होत्या. यानंतर आता भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल या इंधन कंपन्यांचा इंधनपुरवठा सुरू झाला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here