Mahayuti News | राज्यात प्रचंड मोठं यश महायुती मिळवणार! तिन्ही पक्षांचा मेगाप्लॅन समोर

0
2
Mahayuti News
Mahayuti News

Mahayuti News | लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना अशातच महायुतीच्यावतीने आज मुंबईत पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीसाठीचा महायूतीचा मेगाप्लॅन सांगितला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीला एकत्र सामोरं जाण्याचा आमचा निर्धार असल्याचं महायुतीने स्पष्ट केला आहे. या पत्रकार परिषदेत मंत्री दादा भुसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि सुनील तटकरे उपस्थित होते.

Horoscope Today 3 January | ‘या’ राशीच्या व्यक्तींनी पार्टनर सोबत पारदर्शकता ठेवावी अन्यथा….,जाणून घ्या आजचे राशीभविष्य
मुंबईत महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद सुरु होती यावेळी नेते सुनील तटकरे बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, राज्यभरात महायूतीचे मेळावे घेण्याचं नियोजन असून १४ जानेवारीपासून हे मेळावे घेतले जातील. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यभर हे मेळावे घेणार आहोत. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत हे मेळावे संपूर्ण करण्याचा आमचा निर्धार आहे. महायूतीचे आगामी निवडणुकांचे नियोजन आपल्या पक्षाला तसेच घटक पक्षांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला कळावे म्हणून ही पत्रकार परिषद घेण्यात आल्याचं अजित पावार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

Mahayuti News | जानेवारीमध्ये संपूर्ण जिल्हास्तरीय मेळावे पार पडतील

यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे बोलताना म्हणाले की, आगामी सगळ्या निवडणुकांमध्ये संघटीत मार्गक्रमण करण्याचा निर्णय महायुतीने घेतला असून राज्यभर महायुतीचे मेळावे घेतले जाणार आहे. दरम्यान, आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे राज्यभर मेळावे घेतले जातील. यात प्रथमतः जिल्हास्तरीय त्यानंतर तालुकास्तरीय मेळावे घेतले जातील. साधरणतः जानेवारीमध्ये संपूर्ण जिल्हास्तरीय मेळावे पार पडतील. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात विभागीय स्तरावर आणि बूथस्तरावर मेळावे घेतले जातील. या सर्व मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या मेळाव्यांमध्ये सक्रीय असतील.

Rape Case | ‘ते’ फोटो व्हायरल केल्याची धमकी देत; कॅफेमध्येच मुलीवर अत्याचार

तसेच या मेळाव्यांमध्ये घटक पक्षातील नेते देखील उपस्थित असतील असं या पत्रकार परिषदेत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच आम्ही लोकसभेला ४५हुन अधिक जागा जिंकतोय असा ठाम विश्वास महायुतीने स्पष्ट केला असून आम्ही तीनही पक्षांनी आपापल्या स्तरावर आपला पक्ष मजबुतीचं काम सुरु केलं आहे. तसेच महाराष्ट्रात प्रचंड मोठं यश महायुती मिळवणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here