Skip to content

Rape Case | ‘ते’ फोटो व्हायरल केल्याची धमकी देत; कॅफेमध्येच मुलीवर अत्याचार

Rape Case

Rape Case |  छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना या दुपटीने वाढल्या असून, गेल्या दोन आठवड्यातच या जिल्ह्यातून तब्बल चार बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. यापैकी दोन मुली या अल्पवयीन असून, धक्कादायक म्हणजे यात एका सहा वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. दरम्यान, यानंतर पुन्हा एक घटना समोर आली आहे.(Rape Case)

अधिक माहितीनुसार, अभ्यासिकेत ओळख झालेल्या मित्राकडूनच कॉफी शॉपमध्ये नेत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर थेट कॅफेत अत्याचार केल्याच्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच, वारंवार घडत असलेल्या या अत्याचाराच्या घटनांमुळे आता जिल्ह्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, या प्रकरणी संबंधित पीडित मुलीच्या तक्रारीवरून सातारा पोलीस ठाण्यातमध्येआरोपी नितीन वाघ या तरुणाच्या विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.(Rape Case)

Latur Crime | जिगरी मित्रच निघाला आईचा प्रियकर; म्हणुन झोपेतच संपवले

Rape Case | अधिक माहितीनुसार… 

छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या आई आणि भावाबरोबर राहते. तसेच, शहरामधील एका पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ती शिक्षण घेत होती. काही दिवसांपूर्वीच पीडित मुलीची तिच्या एका मैत्रिणीच्या माध्यमातून नितीन वाघ यांच्याशी ओळख झाली. दरम्यान, त्यावेळी नितीन वाघ याने तिचा फोन नंबर घेतला आणि त्यानंतर तो तिला फोन करुन त्रास देऊ लागला. यामुळे तिने त्याला फोन न करण्यास अनेकदा सांगितले.

मात्र, तरीही तो तिला वारंवार फोन करायचा. १९ नोव्हेंबर रोजी आरोपीने तिला फोन करून त्याच्या घरी अभ्यासासाठी बोलावले. तेव्हा पीडित मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत आणि आणखी एका मित्रासोबत नितीनच्या घरी गेले होते. दरम्यान, थोड्या वेळानंतर आरोपीने पीडित मुलीला रुममध्ये नेत दरवाजा लावला आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने जोरदार विरोध करत स्वतःची सुटका करून घेतली. पण बदनामीच्या भितीने संबंधित मुलीने याबाबत तिच्या मैत्रिण आणि मित्राला तसेच घरीही कुणाला सांगितले नाही.(Rape Case)

Crime News | माझ्याशी लग्न कर नाहीतर…; तरुणीसोबत केले धक्कादायक कृत्य

‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी…

यानंतर काही दिवसांनंतर पुन्हा संबंधित आरोपीने तिला फोन करत फिरायला जावू असे सांगत बोलावून घेतले. या नंतर तिला एका हॉटेल रुममध्ये नेले व काही सेल्फी काढले. यावेळी त्याने पुन्हा तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या अंगावरचे कपडे जबरदस्तीने काढत तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान,  एवढ्यावरच व थांबता त्यानंतर त्याने तिला मारहाण केली आणि बळजबरी करत त्याच्यासोबत तिचे नग्न अवस्थेतील फोटो काढले. या घटनेनंतर आरोपीने तिला ते फोटो व्हायरल करण्याची धमकीदेखील दिली. यानंतर पुन्हा धमकावत त्याने तिला एका कॅफेत नेले आणि पुन्हा तिच्यावर जबरदस्ती करत अत्याचार केले. (Rape Case)

या अत्याचाराच्या घटनेनंतर पिडीत मुलगी ही ताणावत गेली व सतत एकटी किंवा झोपून राहू लागली. तिच्या वागण्यातील बदल बघितल्यानंतर भावाने तिला विश्वासात घेतले आणि यानंतर तिने भावाला सांगितले. तसेच, ३१ डिसेंबर रोजी पीडित मुलीने आईसह सातारा पोलीस ठाणे गाठत आरोपीच्या विरोधात तक्रार केली आहे.(Rape Case)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!