Shivraj Singh | केंद्रीय मंत्रीपदासाठी शिवराज सिंह यांचे त्र्यंबकरायाला साकडे..?

0
2
Shivraj Singh
Shivraj Singh

Shivraj Singh |  मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे बारा ज्योतिर्लिंगांपैकी असलेल्या त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. दरम्यान, शिवराज सिंह चौहान यांनी या नवीन वर्षाची सुरुवात ही त्र्यंबक राजाच्या दर्शनाने केली आहे. तसेच यावेळी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केंद्रीय मंत्री मंडळात महत्त्वाचे आणि मोठे पद मिळावे यासाठी साकडे घातले असल्याची यावेळी उपस्थितांमध्ये सुरू असल्याचे पाहायला मिळाले. (Shivraj Singh)

Nashik | मोदींच्या नाशिक दौऱ्यात गोदा महाआरतीची घोषणा होणार?

केंद्रीयमंत्री पदासाठी साकडे ?

दरम्यान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे आज त्रंबकेश्वरच्या दरबारात दर्शनासाठी आले असून, यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्रीमंडळात महत्त्वाच्या पदासाठी साकडे घातले असल्याची चर्चा यावेळी सुरू होती. यावेळी शिवराज सिंह यांनी सहकुटुंब त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेतले व त्र्यंबकरायाला साकडे घातले. दरम्यान, त्यांनी याठिकाणी दर्शन घेत नव वर्षाची शुभ सुरुवात केली असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त आणि पुरोहित यांनी यावेळी त्यांचे याठिकाणी स्वागत केले. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. मात्र, शिवराज सिंह यांच्या चाहत्यांची फारच कमी उपस्थिती होती.(Shivraj Singh)

Nashik Prahar | कलावंतांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आता लढणार प्रहार!

Shivraj Singh | कोण आहेत शिवराजसिंह चौहान..?

शिवराज सिंह चौहान हे भारतीय जनता पक्षाचे नेते असून, ते २००५ ते २०१८ या काळात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर २०२० ते  २०२३ याकाळातही ते मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते. सन २००६ या वर्षापासून मध्य प्रदेशमधील बुधनी येथून  विधानसभेचे ते सदस्य होते. ते मध्य प्रदेशचे सर्वाधिक काळ राहिलेले लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत.

तसेच ते २०२९ ते २०२० या काळात भाजपचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच संसदीय मंडळाचे सदस्य व भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्यही होते. भाजपचे नेते म्हणून, चौहान यांनी महासचिव तथा मध्यप्रदेश राज्याचे युनिटचे अध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे. (Shivraj Singh)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here