Big Breaking | ट्रॅंकर चालकांचा संप अखेर मागे; वाहनधारकांना मोठा दिलासा

0
4
Big Breaking
Big Breaking

Big Breaking | नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्याशी चर्चा करून ट्रक चालकांच्या संपावर तोडगा काढण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी संबंधित प्रतिनिधींशी मनमाड येथे चर्चा करत तोडगा काढला असून हा संप मागे घेण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यातील मनमाड पानेवडी येथील इंधन प्रकल्पातील टँकर चालकांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला असून आज सकाळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दूरध्वनीवरून चर्चा करत जिल्हाधिकाऱ्यांना बैठक घेवून तोडगा काढण्याच्या सूचना केल्या होत्या. यानंतर आता भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल या इंधन कंपन्यांचा इंधनपुरवठा सुरू झाला आहे. ट्रक चालकांचा संप मागे घेतल्याने इंधन टंचाईचा सामना करणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील इंधन परिस्थिती पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे.

Petrol News | टॅंकर चालकांचं आंदोलन; जिल्हाधिकारी काढणार तोडगा?

ट्रक चालकांच्या संपाचा संपूर्ण देशात परिणाम होताना दिसत होता. यातच मनमाडमध्ये इंधन वाहतूक करणाऱ्या दीड हजार वाहनांची चाकं थांबली असून मनमाडमध्ये इंधन प्रकल्पाबाहेरच टँकर चालकांनी आंदोलन सुरु केलं होतं. यावेळी मोठ्या प्रमाणात वाहनचालक उपस्थित असताना नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा ट्रक चालकांशी चर्चा करण्यासाठी मनमाड येथे दाखल झाले आणि त्यांनी या आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली आहे. पोलीस अधीक्षक शहाजी उमपदेखील या बैठकीला उपस्थित होते. मनमाडमधील इंधन प्रकल्पाबाहेर ट्रॅंकर चालकांनी आंदोलन छेडलेलं असताना ट्रॅंकर चालकांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक पार पडली आहे.

नाशिक शहरात काल रात्रीपासूनच पेट्रोल-डिझेल पंपावर वाहन धारकांच्या रांगाच्या रांगा लागल्याचं पहायला मिळत आहेत. अनेक जण गाडीत तसेच बाटलीत आणि कॅनमध्ये पेट्रोल भरून साठवले जात आहे. तसेच जिल्ह्यात आज दुपारपर्यंत पुरेल इतकाच इंधन साठा शिल्लक असल्याची माहिती समोर येत असून यामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Petrol News | काय आहे नेमकं प्रकरण ?

नवीन मोटार वाहन कायद्यात अपघातास ट्रकचालकाला जबाबदार धरले जाणार असून या कायद्यानुसार दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद केली आहे. तसेच सात लाख रुपये दंड करण्यात येणार असल्याने नवीन मोटार वाहन कायद्याला देशभरात ट्रक आणि टँकर चालकांनी विरोध केला. हा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी पेट्रोलियम कंपन्यांच्या टँकरचालकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असताना देशभरात विविध ठिकाणी सोमवारी आंदोलन करण्यात आले. तसेच नाशिकमधील मनमाड डेपोतून एकही टँकर बाहेर पडले नाही आणि यामुळे मनमाड डेपोतून इंधन वाहतूक ठप्प झाली आहे.

Petrol Breaking | पेट्रोल-डिझेल तुटवड्यामुळे शेतकरी, विद्यार्थ्यांना फटका


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here