Income Tax | नव्या करणप्रणालीत महत्त्वाचे बदल; आता किती टक्के कर भरावा लागणार?

0
63
Income Tax
Income Tax

Income Tax |  संसदेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी सभागृहात पहिला वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिला, तरुण, शेतकरी, आणि गरीब यांच्यावर विशेष भर देण्यात आला असून, रोजगार निर्मिती, व्यवसाय, महागाई, गुंतवणुक आणि कर याबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.

तर, करप्रणाली करण्यात आलेल्या बदलांनुसार जुन्या करप्रणालीप्रमाणे कर भरणाऱ्यांसाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही नसून, नवीन करप्रणालीप्रमाणे कर भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आता नव्या करप्रणालीप्रमाणे कर भरणाऱ्या नोकरदारांची 17500 रुपयांची बचत होणार आहे. दरम्यान, नव्या करप्रणालीत स्टँटर्ड डिडक्शनची मर्यादा ही वाढवण्यात आली असून, ती 50 हजारावरुन 75 हजारावर करण्यात आली आहे. तर फॅमिली पेन्शन डिडक्शनची मर्यादादेखील 15 हजारावरुन 25 हजारांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Income Tax)

Union Budget 2024 | मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प; काय स्वस्त आणि काय महाग..?

Income Tax |  कोणाला किती कर भरावा लागणार?

  1. 3 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर भरावा नाही
  2. तर, 3 लाख ते 7 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना 5 टक्के कर भरावा लागेल
  3. 7 लाख ते 10 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना 10 टक्के कर
  4. 10 लाख ते 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना 15 टक्के कर
  5. 12 लाख ते 15 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना 20 टक्के
  6. 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न रुपये उत्पन्न असणाऱ्यांना 30 टक्के कर हा भरावा लागणार आहे.

यासोबतच स्टार्टअपला चालना देण्यासाठी एंजेल टॅक्स हा आजपासूनच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅपिटल गेन टॅक्स 20 वरून 12.5 टक्के असणार आहे. तर, इन्कम टॅक्स प्रक्रिया सोपी करणार असल्याचेही यावेळी अर्थमंत्र्यांनी सांगितले. TDS वेळेत भरला नाही तर तो आता गुन्हा होणार नाही, हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (Income Tax)

Budget 2024 Updates | ‘या’ तरुणांना महिन्याला ५ हजार रुपये देणार; अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here