South Korea | दक्षिण कोरियाची संस्कृती हि जगात प्रसिद्ध असून दक्षिण कोरियन बॅण्ड्स जसे कि BTS आणि BlackPink यांनी पूर्ण जगातील तरुणाईला अक्षरशः वेड लावलेले आहे. दक्षिण कोरिया या देशाचा ‘के-ड्रामा‘ हा संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. तसेच दक्षिण कोरिया हा देश आर्थिक दृष्ट्याही विकसित देश आहे. नुकतच दक्षिण कोरियात एक धक्कादायक घटना घडलेली आहे.
Big Breaking | ट्रॅंकर चालकांचा संप अखेर मागे; वाहनधारकांना मोठा दिलासा
दक्षिण कोरियाच्या मीडिया स्टेशन्सच्या व्हिडिओनुसार, नवीन विमानतळाचे प्रस्तावित स्थान पाहिल्यानंतर पत्रकारांच्या गटामध्ये फिरत असताना एका व्यक्तीने दक्षिण कोरियाचे मुख्य विरोधी पक्षनेते ली जे-म्युंगच्या मानेवर वार केला. 59 वर्षीय वृद्धाला जमिनीवर घसरत असल्याचे दिसल्याने लोक त्याच्या मदतीसाठी धावले. एक व्यक्ती ली जे-म्युंगच्या मानेवर रुमालाने दाब देत असल्याचे दिसून आले. एका साक्षीदाराने स्थानिक प्रसारक YTN ला सांगितले की, “तो पत्रकारांशी बोलत असताना त्याच्या कारकडे चालत होते जेव्हा हल्लेखोराने त्यांच्या मानेवर चाकूने वार करण्यापूर्वी त्याचा ऑटोग्राफ मागितला आणि मग वार करण्यात आला.”
Petrol News | टॅंकर चालकांचं आंदोलन; जिल्हाधिकारी काढणार तोडगा?
South Korea | तातडीने आरोपींना अटक
मिळालेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षनेते ली जे-म्युंग यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे. तर ली जे-म्युंगवर चाकूने मानेवर वार केले. जखमींबाबत फारशी माहिती समोर आलेली नसून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये ते डोळे मिटून जमिनीवर पडलेले दिसत आहे. दरम्यान, जे-म्युंग यांनी यापूर्वी बुसानमधील गदेओक बेटावर निर्माणाधीन नवीन विमानतळाच्या जागेला भेट दिली होती.यानंतर ली जे-म्युंग यांच्यावर चाकूने वार करण्यात आला तसेच तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम