Union Budget 2024 | मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प; काय स्वस्त आणि काय महाग..?

0
110
Union Budget 2024
Union Budget 2024

Union Budget 2024 |  मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सादर केला यात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या असून, कर प्रणालीत महत्त्वाचे बदल केल्याने अनेक वस्तूंच्या किंमतीत बदल होणार आहे. तर, आजच्या या अर्थसंल्पानंतर काय स्वस्त आणि काय महाग होईल. हे पाहुयात…

Union Budget 2024 | काय स्वस्त..? 

  • सोने, चांदी, प्लॅटिनमच्या दागिन्यांवरील कस्टम ड्यूटी 6 टक्क्यांनी कमी करण्यात आल्याने आता हे दागिने स्वस्त होणार हे.
  • मासेमारी आणि संलग्न व्यवसायाला चालना मिळावी. यासाठी माशांपासून बनणारी उत्पादनं स्वस्त होणार
  • भारतीय बनावटीच्या मोबाईल आणि चार्जरवरील सीमाशुल्क कमी करण्यात आल्याने आता मोबाईल, मोबाईलचे सुटे भाग आणि चार्जर 15 टक्क्यांनी स्वस्त होणार आहे.
  • चामडयाच्या वस्तु स्वस्त होणार
  • कॅन्सरच्या औषधं कस्टम ड्यूटी फ्री करण्यात आल्याने कॅन्सरची औषधं आता स्वस्त होणार आहेत.
  • सौरऊर्जा पॅनल स्वस्त
  • इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होणार
  • घरगुती उत्पादनांवरील कस्टम ड्यूटी कमी केल्याने तेही स्वस्त होऊ शकतात.
  • औषधे आणि मेडिकल उपकरणांवरील कस्टम ड्यूटी कमी
  • पोलाद, तांबे उत्पादनास करसवलत दिल्याने तांब्याच्या वस्तुही स्वस्त होणार (Union Budget 2024)

Budget 2024 Updates | ‘या’ तरुणांना महिन्याला ५ हजार रुपये देणार; अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा

काय महाग..?

प्लास्टीक उद्योगांवरील करांचा बोजा वाढणार असल्याने आता प्लास्टीकपासून बनणाऱ्या वस्तु महाग होतील.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here