सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | संजय गांधी निराधार तसेच श्रावणबाळ योजना अंतर्गत देण्यात येणारे दिव्यांगांचे माहे ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर २०२४ या तीनही महिन्यांचे थकीत पेंशन त्वरित मिळावे. या मागणीचे निवेदन आज मंगळवारी दि. २४ रोजी श्रावण बाळ दिव्यांग विकास बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने देवळा तहसील कार्यालयात देण्यात आले. निवेदनाचा आशय असा की, राज्य शासनाकडून वेळोवेळी दिव्यांगांना दरमहा मिळणारा पगार आपल्या विभागाकडून अद्यापही देय झालेला नाही.
Deola | श्रावण बाळ संस्थेची बांधिलकी; दिव्यांग बांधवांसोबत साजरी केली दिवाळी
माहे ऑक्टोबर नोव्हेंबर व डिसेंबर २०२४ या तीनही महिन्यांचे थकीत पेन्शन मिळावे व दिव्यांगाचे रोजच्या जीवनमानात जेनेकरून त्यांना त्रास भासणार नाही हे उदिष्ट डोळ्यासमोर ठेऊन लवकरात लवकर डी.बी.टी. प्रणालीद्वारे वाटप करावे जेणेकरून त्यांना आंदोलनात सामील होऊन त्रास होणार नाही. हे लक्षात घेऊन दिव्यांगांचा दरमहा शासनाकडून मिळणारा पगाराचा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा येत्या २७ जानेवारीला देवळा तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील दिव्यांग आंदोलन छेडतील असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण देवरे, सचिव अर्जुन देवरे, अशोक निकम, विलास जाधव आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम