Skip to content

Rape Case | फूस लावत घरी बोलावले अन्..; मित्रांसह प्रेयसीवर अत्याचार

Rape Case

Rape Case |  राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यात प्रामुख्याने महिलांवरील अत्याचारात तर लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान, अशातच आता ठाण्यातून एक मोठी खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमध्ये संबंधित पीडित अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे.

या प्रकरणी पीडीत मुलीसोबत तिच्या प्रियकराने आणि त्याच्या मित्रांनी मिळून हे घृणास्पद कृत्य केलेले आहे. या घटनेमुळे आता संपूर्ण ठाण्यात खळबळ उडाली आहे. तसेच, ठाण्यात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या प्रकरणी पीडित मुलीने पोलिसात तक्रार दिल्यानंतर ठाणे पोलिसांनी संबंधित दोन आरोपींच्या मुख्य आवळल्या आहेत. मात्र, यातील एक आरोपी हा पसार झालेला आहे. या प्रकरणाचा सविस्तर तपास ठाणे पोलीस करत आहेत.(Rape Case)

Rape Case | ‘ते’ फोटो व्हायरल केल्याची धमकी देत; कॅफेमध्येच मुलीवर अत्याचार

Rape Case | नेमकं प्रकरण काय ?

ठाण्याच्या मुरबाड येथे ही घटना घडलेली असून, या प्रकरणी संबंधित पीडीत अल्पवयीन मुलीचे एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. दरम्यान, तिच्या या आरोपी प्रियकराने तिला लग्नाचे आमिष दाखवत आणि फूस लावत आरोपी प्रियकराने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवलेले होते. या दरम्यान तिच्या प्रियकराने तिचे काही अश्लील फोटो तसेच काही व्हिडिओ देखील काढलेले होते.

दरम्यान, या पीडीत मुलीचे हे फोटो व व्हिडिओ दाखवत संबंधित आरोपी तिला ब्लॅकमेल करत होता. तसेच, या आरोपी प्रियकराने पीडित मुलीला त्याच्या काही मित्रांसोबतही शारीरिक संबंध ठेवण्यासाठीही जबरदस्ती केलेली होती. मात्र पीडीत मुलीने याला विरोध केला असता, या नंतर आरोपीने मुलीला फुस लावण्यास सुरूवात केली आणि तिचे फोटो व व्हिडिओ डिलीट करण्याच्या खोट्या बहाण्याने तिला स्वतःच्या घरी बोलावले होते.(Rape Case)

Rape Case | पोलिसच असं वागले तर…!, न्यायाची अपेक्षा कुणाकडून ठेवावी

आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवत मुलगी त्याच्या घारी गेली असता, समोर त्याच्यासोबत आधीच घरात उपस्थित असलेल्या त्याच्या आणखी दोन मित्रांना पाहून तिला धक्का बसला. त्यानंतर मुख्य आरोपी असलेल्या प्रियकरासह त्याच्या आणकही दोन मित्रांनी संबंधित पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. दरम्यान, या बलात्काराच्या घटनेनंतर हे तिन्ही आरोपी पसार झाले. या नंतर पीडीत मुलगी ही कशीबशी स्वतःच्या घरी पोहोचली व तिने तिच्या कुंटुंबाला या सर्व घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितले.

त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी तिच्यासह वाघीवली येथील पोलीस ठाणे गाठत संबंधित आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, या तक्रारीनंतर वाघीवली पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले होते. यानंतर पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून, एक आरोपी अद्यापही फरार आहे. फरार आरोपीचा शोष वागवली पोलिस घेत आहे. (Rape Case)

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!