Skip to content

Horoscope 12 january | ‘या’ लोकांनी आरोग्याबाबत सतर्क रहावे; वाचा आजचे राशिभविष्य

Horoscope 24 April 2024

Horoscope 12 january |  ज्योतिष शास्त्रानुसार, १२ जानेवारी २०२४, शुक्रवार हा दिवस महत्त्वाचा आहे. आज ग्रहांपासून वाशी योग, आनंदादि योग, सुनाफ योग, पराक्रम योग हे योग तयार होत आहेत. चंद्र आज मकर राशीत असेल. शुभ कार्यासाठी आजचे शुभ मुहूर्त लक्षात घ्या. आज पुढील दोन मुहूर्त आहेत.

सकाळी ८. १५  ते १०. १५ पर्यंत लाभ होईल –  आणि दुपारी १. १५  ते २. १५ पर्यंत. आज सकाळी १०. ३० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत राहु काळ असेल. आज कुठल्या राशीच्या भाग्यत काय आहे. जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य –

मेष राशी –

चंद्र दहाव्या घरात असेल त्यामुळे आज नोकरदार व्यक्तीला ऑफिसमधून एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते. पण, मिळालेली जबाबदारी ही नियोजनपूर्वक पार पाडा. व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात प्रगतीसाठी योग्यरित्या आर्थिक नियोजन करावे लागणार आहे. आज विद्यार्थ्यांना काही कठीण आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. ज्यावर ते त्यांच्या कठोर परिश्रमाने मात करू शकतील. मात्र, आज खरेदी करताना हात जरा आखडता घ्या. कुटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन खर्च करा. तसेच, पैशांच्या बचतीकडे आज विशेष लक्ष द्या. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, बद्धकोष्ठतेशी संबंधित आजारांबाबत सतर्क रहा.(Horoscope 12 january)

वृषभ राशी – 

नवव्या घरात चंद्र असल्यामुळे आज तुमच्या हातून काही धार्मिक कार्य होतील. नोकरदार वर्गासाठी कामाच्या ठिकाणी आजचा दिवस हा सामान्यच असेल. व्यावसायिकांनी आज पैशाच्या बाबतीत जरा विचारपूर्वक निर्णय घेतला तर त्याचा फायदाही होईल. आज कुठलेही निर्णय घेण्यासाठी घाई करणे टाळा. मात्र, निष्काळजीपणामुळे तुम्हाला मोठे नुकसानही होऊ शकते. विद्यार्थ्यांनी आज त्यांच्या भाषेवर नियंत्रण ठेवावे. वैवाहिक आयुष्यात किंवा मित्रांमध्ये काही वाद असतील. तर, त्यांच्यासोबत त्या मुद्द्यांवर चर्चा करणे टाळावे. अन्यथा परिस्थिती आणखी बिघडू शकते. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आपल्या दैनंदिन दिनचर्यामध्ये व्यायामाचा समावेश करावा.(Horoscope 12 january)

Horoscope 10 January | ‘या’ लोकांना मिळणार नोकरीची संधी; वाचा आजचे राशीभविष्य

मिथुन राशी –

आठव्या घरात चंद्र असल्यामुळे आज सासरी काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते. नोकरदार वर्गाला आज कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून एखादी गोष्ट सांगितली असल्यास ती गांभीर्याने घ्या आणि तुमच्या चुका लक्षात घेऊन त्यात सुधारणा करा. सहकाऱ्यांसोबत कोणत्याही प्रकारचा वाद टाळा. व्यवसायिकांनी त्यांच्या व्यवसायाबाबत कुठलेही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आज तुम्ही गरजूंना अन्नपदार्थ दान केल्यास कुटुंबाच्या शांतीसाठी ते अत्यंत फायदेशीर ठरेल. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, आज तुमच्या निष्काळजीपणामुळे तुम्ही जखमी होण्याची शक्यता असल्याने अनावश्यक फिरणे टाळावे.(Horoscope 12 january)

कर्क राशी – 

चंद्र सातव्या घरात असल्यामुळे आज जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. नोकरदार वर्गावर आज बॉस खुश असेल. तुम्ही कामाच्या ठिकाणी केलेल्या सादरीकरणाबद्दल आज तुमची प्रशंसा होईल. तसेच, आज तुमचे कामाचे टार्गेटही पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनी केलेली जुनी गुंतवणूक ही आज त्यांना फलदायी ठरेल. तसेच, आज एखादा मोठा व्यवहार होऊ शकतो. आजचा दिवस जरा कसोटीचा असेल कारण आज कौटुंबिक वातावरण हे खराब असेल तर, आपल्या आनंदी स्वभावाने आज कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. आरोग्याबाबत, चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे शरीरातील पित्ताचे प्रमाण वाढू शकते.(Horoscope 12 january)

Horoscope 12 january | सिंह राशी –

चंद्र सहाव्या घरात राहील असल्यामुळे आज तुम्हाला जुन्या आजारांपासून आराम मिळेल. नोकरदार वर्गाने प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर अधिक भर द्यावा. ऑफिसमध्ये कामाने इतरांना प्रभावित करण्यात आज यश मिळेल. त्यामुळे आज कामावर अधिक लक्ष केंद्रित करा. व्यावसायिकांना आज आर्थिक फायदा होईल. राजकीय क्षेत्राशी संबंधित लोकांचे सामाजिक स्तरावर आज तुमच एउळलेकणीय काम होईल. कुटुंबाशी काही गंभीर विषयांवर चर्चा होईल. मात्र, यामुळे वाद उद्भवणार नाही याची काळजी घ्यावी. मन अस्वस्थ असल्यास आज काही काळ भागवत भजनाचे ध्यान करणे हे तुमच्यासाठी चांगले राहील. (Horoscope 12 january)

कन्या राशी – 

चंद्र पाचव्या घरात असल्यामुळे आज विद्यार्थ्यांच्या अभ्यासात बदल होईल. नोकरदार वर्गाचे आज कामाच्या ठिकाणी सहकार्‍यांचे वर्तन सहकार्याचे असेल. मात्र, तुमचे काम पूर्ण झाल्यानंतर सहकाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना आज दिलासा मिळेल. तुम्हाला आज इच्छित नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना त्यांच्या मेंदूचा पुरेपूर वापर करण्याची आणि व्यवसायाच्या वाढीसाठी नवीन योजना तयार करण्याची आणि त्यांचे अनुसरण करण्याची संधी मिळेल. मात्र, आज आरोग्याबाबत सतर्क राहावे.(Horoscope 12 january)

Horoscope 9 January | ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जोडीदाराची साथ; वाचा आजचे राशीभविष्य

तूळ राशी – 

चंद्र चौथ्या भावात राहील्यामुळे आज घरातील वाडीलधाऱ्यांची तब्येत बिघडू शकते. व्यवसायिकांची आज त्यांच्या व्यवसायातील कामाच्या प्रलंबिततेबद्दल चिंता वाढणार आहेत. दरम्यान, या चिंतेमुळे आज तुमचा मूड दिवसभर खराब राहू शकतो. जमीन किंवा घराच्या खरेदी-विक्रीसाठी थोडी प्रतीक्षा करणे फायदेशीर ठरेल. वैवाहिक जीवनात आज जोडीदारासोबतचे वाद मिटवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. थोड्या प्रयत्नाने तुमचे घरगुती जीवनही चांगले होऊ शकते. आरोग्याबाबत, तर जे लोक आधीच आजारी होते त्यांनी आज आरोग्याबाबत अधिक सतर्क राहावे.

वृश्चिक राशी – 

चंद्र तिसऱ्या भावात असेल ज्यामुळे आज मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. नोकरदार वर्गाला आज कामाच्या ठिकाणी तुमच्या इतर सहकाऱ्यांची मदत करावी लागू शकते. त्यांना निराश करू नका. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी आज त्यांच्या भागीदारांसोबत व्यवसायाच्या बाबतीत काही बैठका घ्याव्यात. जर तुम्ही भागीदारीत एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ते करू नका. व्यावसायिकांना आज आर्थिक लाभ होऊ शकतो. आज तुम्हाला तुमच्या सासरच्या मंडळींकडून शुभ कार्याची माहिती मिळू शकते. आरोग्याबाबत काही समस्या असल्यास त्याला हलक्यात घेऊ नका, उपचार करा.(Horoscope 12 january)

धनु राशी – 

चंद्र दुस-या भावात असल्यामुळे आज नोकरदार वर्गाचे कामाच्या ठिकाणी त्यांच्या सहकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींववरून वाद न घालण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिकांना आज काही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल. आज तुम्हाला कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. मात्र, आज कामाच्या बाबतीत आळस करणे टाळा. आज तुम्ही रागावर नियंत्रण ठेवावे. नहितर, तुमची चिडचिडीमुळे तुमच्या प्रियजनांना त्रास होऊ शकतो. विवाहयोग्य तरुण-तरुणींसाठी आज स्थल येऊ शकते.  मात्र, योग्य तपासानंतरच लग्नाला होकार द्या. आरोग्याबाबत, आज तुम्हाला अपचनासारखी स्थिती उद्भवू शकते, हलके अन्न खावे.(Horoscope 12 january)

मकर राशी – 

चंद्र आज तुमच्या राशीमध्ये असेल, त्यामुळे आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरदार वर्गावर आज कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ आणि बॉस खूश असतील आणि तुमची प्रशंसाही करतील. व्यावसायिकांना आज लहान व्यवहारांमधून मोठा नफा मिळेल. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांनाही वेळ देता येईल. व्यावसायिकांनी आज आपल्या भाषेवर नियंत्रण ठेवावे. याद्वारे आपले काम होऊही शकते किंवा बिघडूही शकते. तरुणांनी आज वादग्रस्त प्रसंग टाळावे. आरोगयाबाबत, उंचीवर कोणतेही काम करताना सतर्क राहावे. उंचीवरून पडून दुखापत होण्याची शक्यता आहे.

कुंभ राशी – 

चंद्र १२ व्या भावात असेल त्यामुळे आज खर्च करताना हात आखडता घ्या. कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला योग्य पद्धतीने सर्व गोष्टींचे नियोजन करावे लागेल. तुम्हाला तुमची प्रलंबित कामे ही आज पूर्ण मेहनतीने पूर्ण करावी लागतील. आज दिवसाच्या सुरुवातीस, नोकरदार व्यक्तींना कामाच्या बाबतीत तणाव असू शकतो, व्यावसायिकांनी आज बोलक्या लोकांपासून सावध राहावे. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. आरोग्याबाबत, केसांशी संबंधित काही समस्यांमुळे तुम्ही आज चिंतेत असाल. त्याचे उपचार डॉक्टरांच्या मदतीने किंवा सौंदर्य उपचार शोधले पाहिजेत.(Horoscope 12 january)

मीन राशी – 

चंद्र ११ व्या भावात राहील त्यामुळे आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कामात चांगली कामगिरी करण्यासाठी एकाग्रता राखावी लागेल. एखाद्या व्यावसायिकांना आज व्यवसायातील काही समस्यांमुळे आज तुमचा मूड खराब राहू शकतो. मात्र, तुमचे काम संयमाने करा. आज मंदिरात जाऊन देवतांचे दर्शन घ्यावे. तसेच, आज कौटुंबिक वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी आगामी निवडणुका लक्षात घेता कोणतीही खोटी आश्वासने देऊ नये. अन्यथा ते तुमच्यावरच उलटू शकते. आरोग्याबाबत,  आज तुमच्या शारीरिक वेदना वाढू शकतात. तसेच पाय दुखण्याची शक्यता आहे.(Horoscope 12 january)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!