Crime News | ‘धोखा देने वालों की एक ही सज़ा है ‘मौत’ म्हणत माथेफिरुने प्रेयसीला संपवलं; ७८ दिवसांत लागला निकाल

0
45
Mumbai Crime
Mumbai Crime

Crime News : 11 जून रोजी उत्तर प्रदेशातील खुर्जाच्या मोहल्ला खीरखानी येथे राहणाऱ्या आसमाची स्मशानभूमीत नेऊन गळा चिरून हत्या केली होती. याप्रकरणी आसमाचा पती सलीम याने संशयित आरोपी अदनान वर हत्येचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी अहवाल नोंदवून घेत पोलिसांनी आरोपी अदनान उर्फ बल्लू याला अटक केली आणि खुणात वापरलेल्या चाकू देखील जप्त केला होता. यानंतर पोलिसांनी 30 जुलै रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश कक्ष क्रमांक (2), वरून मोहित निगम यांच्या समोर हजर करण्यात आले. न्यायालयात दोषारोपपत्र सादर केल्यानंतर 13 दिवसांच्या आत न्यायालयाने आरोपी अदनान उर्फ बल्लू याला आसमाच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची आणि 52 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Nashik Crime | संतापजनक..! नाशिकमध्ये शिक्षकाकडून चिमूरडीचा विनयभंग; चार दिवसांत दुसरी घटना

Crime News | कोणत्या कलमांतर्गत सुनावली शिक्षा? 

यावेळी “हा गुन्हा दुर्मिळ श्रेणीत येत नसला तरी गुन्हेगाराच्या चेहऱ्यावर पुन्हा केल्याचा पश्चाताप नाही. अशा परिस्थितीत गुन्हेगाराला शिक्षा दिल्याने समाजात न्यायाचा संदेश जाईल. त्यामुळे आरोपी दोषी ठरतो आणि त्यामुळे त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली जात आहे. शिक्षेच्या सुनावणीनंतर आस्माचा पती सलीम याने आपल्याला लहान मुले असून अदनान उर्फ बल्लूने आपल्यावर अन्याय केल्याचे सांगितले व अशा परिस्थितीत कायद्याची मिळालेली मदत आणि न्यायालयाच्या निर्णयाचा मी आदर करतो असे देखील म्हटले.

Crime News | ‘जन्मदाता की हैवान ?’; बापानेच केला पोटच्या गोळ्याचा सौदा

आरोपींना फिल्मी स्टाईलमध्ये दिली होती गुन्ह्याची कबुली

आसमा हत्याकांडात पोलिसांनी अटक केल्यानंतर अदना उर्फ बल्लूने फिल्मी स्टाईलमध्ये गु्न्ह्याची कबुली दिली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये अदनाने “आसमाने प्रेमात फसवणूक केली आणि प्रेमात फसवणुकीची एकच शिक्षा मृत्यू.” असे म्हटले आहे. अदनानचे आसमासोबत मागील अडीच वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. तेव्हा तिच्याकडे कीपॅड असलेला फोन होता. त्यानंतर स्मार्टफोन घेतल्यानंतर आसमा दुसऱ्याशी बोलू लागली. त्यामुळे त्याने आसमाच्या हत्येचा कट रचला असे तपासांती उघड झाले. अदनान ‘बल्लू’ चित्रपटातील बलराम या खलनायकाच्या व्यक्तिरेखेपासून प्रभावित असल्याचे बोलले जाते. तुरुंगातून सुटल्याच्या प्रश्नावर अदनाने इथून सुटल्यानंतर माझे आयुष्य कसे असेल, हे त्यावेळी दिसेल असे सांगितले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here