Deola | देवळा येथील प्रतीक भामरे याची भारत सरकार स्किल इंडिया मोहिमेंतर्गत जर्मनी येथे नोकरीसाठी निवड

0
61
Deola
Deola

देवळा :  खुंटेवाडी (ता.देवळा) येथील प्रतीक बाळकृष्ण भामरे याची भारत सरकार स्किल इंडिया मोहिमेंतर्गत जर्मनी येथे नोकरी व उच्च शिक्षणासाठी निवड झाली. दुष्काळी व इतर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने हा टप्पा गाठला. या निवडीमुळे आईवडिलांच्या कष्टाला कोंदण लाभल्याने त्याचे तालुकाभरातून त्याचे कौतुक होत आहे. प्रतिकचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खुंटेवाडी व देवळा येथे तर पुढील शिक्षण नाशिक येथे झाले.

Deola | संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांप्रमाणे संत सेना महाराजही श्रेष्ठ – केदा आहेर

इंजिनिअरिंगची पदवी मिळवल्यावर एचएएलमध्ये इंटर्नशिप करत जर्मन भाषा शिकण्याचा एक वर्षाचा कोर्सही त्याने पूर्ण केला आणि आता जर्मनीमधील बवारिया शहरात मेकाट्रॉनिकरचा त्याला जॉब मिळाला आहे. प्रतिकचे वडील बाळकृष्ण भामरे हे देवळा येथे अल्पबचत प्रतिनिधीसह इतर कामे करतात. आईवडिलांच्या कष्टाची जाणीव असल्याने प्रतिकने अभ्यासावर लक्ष केंद्रित करत परदेशात जॉब पटकावला शिवाय त्याला अजून पुढे उच्च शिक्षणाची संधी पण आहे. त्याच्या या निवडीबद्दल खुंटेवाडी ग्रामस्थांनी तसेच शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले. यावेळी बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार, बापू राउंदल, सुभाष पगार, जीभाऊ खैरनार, अनिल आहेर आदी उपस्थित होते.

“यश मिळो ना मिळो पण प्रयत्न करणे सोडू नका आणि इतर भाषा शिकण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे आपल्याला इतर देशात नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. मन लावून अभ्यास आणि प्रामाणिकपणे केलेले काम आपणास यश मिळवून देते.” – प्रतीक भामरे


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here