Nashik Crime | संतापजनक..! नाशिकमध्ये शिक्षकाकडून चिमूरडीचा विनयभंग; चार दिवसांत दुसरी घटना

0
77
Nashik Crime
Nashik Crime

Nashik Crime |  राज्यात बदलापूरच्या संतापजनक घटनेमुळे वातावरण तापलेले असतानाच आता नाशिकमधूनही एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बदलापूरच्या घटनेनंतर आता मुलींना शाळेतही पाठवायचे नाही का..? असा संतप्त सवाल पालक वर्गांकडून उपस्थित केला जात होता. यानंतर आता नाशिकमधील या घटनेमुळे मुली कोचिंग क्लासमध्येही असुरक्षित असल्याचं दिसून आलं. माणुसकीला आणि गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्याने नाशिकमध्ये संतापाची लाट उसळली आहे.(Nashik Crime)

इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत खासगी क्लासच्या शिक्षकाने अंगलट करून अश्लील चाळे (Sexual Abuse) केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक शहरातील उपेंद्रनगर परिसरात घडला आहे. या प्रकरणी या नराधम शिक्षकाविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामुळे पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

चार दिवसांत नाशिकमधील दुसरी घटना 

गेल्या आठवड्याभरातील ही नाशिकमधील दुसरी घटना आहे. ज्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार  करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी नशिक जिल्ह्यातील सिन्नतर तालुक्यातील वावी गावात एका ४ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार २१ ऑगस्ट रोजी समोर आला होता. ही घटना ताजी असतानाच आता हा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Nashik Crime)

Nashik Crime | नाशकात चिमुकलीला ओरबाडले; बदलापूरनंतर नाशिकमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार

Nashik Crime |  नेमकं काय घडलं..?

नाशिक शरतील उपेंद्रनगर परिसरात ‘ज्ञानेश्वरी क्लासेस’ हा एक खासगी क्लास आहे. तेथील शिक्षक कृष्णा गजानन दहिभाते विद्यार्थ्यांना सायन्स व इंग्रजी विषय शिकवतो. तर त्याची पत्नी गणित व इतर विषय शिकविते. गुरुवारी (दि. २२) कृष्णा दहिभाते याने त्याच्याच क्लासमधील पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या अकरा वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीशी अंगलट करून अश्लील कृत्य केले. क्लास सुटल्यानंतर घरी गेल्यावर ही विद्यार्थिनी घाबरलेली दिसल्याने तिच्या आई-वडिलांनी विश्वासात घेऊन विचारल्यानंतर आपण उद्यापासून क्लासला जाणार नाही, असे तिने सांगितले.

पालकांनी कारण विचारले असता क्लासच्या शिक्षकाने अंगलट करून अश्लील कृत्य केल्याबाबतची माहिती तिने दिली. “तू तुझ्या घरी काही सांगितले, तर उलट तुझीच तक्रार करेन”, असा दम या शिक्षकाने तिला दिल्याचेही तिने सांगितले. यानंतर या विद्यार्थिनीच्या पालकांनी शुक्रवारी सकाळी क्लासमध्ये जाऊन शिक्षकाच्या पत्नीस ही बाब सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांनी अंबड पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली. त्यानुसार क्लास चालक कृष्णा दहिभाते याच्याविरोधात ‘पोस्को’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. संशयिताला रात्री अटक करण्यात आली असून, अधिक तपास अंबड पोलीस करत आहे.

Nashik Crime | नाशिकमध्ये भुतबाधा झाल्याचे सांगत भोंदू मौलानाकडून महिलेवर अत्याचार


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here