Crime News | ‘जन्मदाता की हैवान ?’; बापानेच केला पोटच्या गोळ्याचा सौदा

0
50

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यभरात अत्याचाराच्या घटनांनी कहर माजवला आहे. त्यातील काही घटना इतक्या भयानक आहेत की काळीज पिळवटून निघते. अशीच मन हेलावून टाकणारी दुर्दैवी घटना मुंबईमध्ये घडली. मुंबईतील एंटोप हिल परिसरात राहणाऱ्या एका निर्दयी बापाने स्वतःच्या पोटच्या गोळ्याला अवघ्या 1.6 लाख रुपयांसाठी विकले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी पित्याबरोबर चार जणांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आला आहे. त्यांना मानवी तस्करी केल्याच्या आरोपाखाली वडाळा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

Maharashtra News | महाराष्ट्रातील ‘लापता लेडीज’ची संख्या लाखांवर; धक्कादायक आकडेवारी समोर

आजोबांच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस

मुंबईतील एंटोप हिल येथील विजयनगर परिसरात हा प्रकार घडला. आरोपी अनिल पुर्वया आपल्या पत्नी काजल आणि मुलासोबत येथे राहत होता. आरोपीचं अमर धीरेन सरदार यांची मुलगी काजल हिच्या सोबत दुसरे लग्न झालं होतं व त्यांना दोन वर्षांचा मुलगा होता. काही दिवसांपूर्वी काजल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर अनिल आपल्या मुलासोबत राहत होता. काजलचे वडील अमर धिरेन यांना आपल्या नातवाला बऱ्याच दिवसापासून भेटायचे होते. परंतु ते शक्य होत नव्हतं त्यामुळे त्यांना अनिल वरती संशय आला. मागील दोन महिन्यांपासून अमर यांना आपल्या नातवाला भेटायचे होते परंतु अनिल दरवेळी त्यांना काही ना काही कारण सांगून विषय टाळात होता. यामुळे अमरयांचा संशय बळावला. त्यांनी नातवाची चौकशी केली असता अनिलने जवळ राहणाऱ्या अस्मा शेख यांच्यातर्फे आपल्या मुलाला विकल्याची घटना समोर आली. उत्तर प्रदेशातील एका जोडप्याला 1.6 सहा लाखांसाठी आपला मुलगा विकल्याचं त्यांना कळताच त्यांनी वडाळा पोलीस ठाण्यात अनिल विरुद्ध तक्रार केली. त्यानंतर प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत वडाळा ट्रॅक टर्मिनस (टीटी) पोलिसांनी त्वरितच तपास करत आरोपी पित्तासह चार जणांना मानवतस्करी गुन्ह्याअंतर्गत अटक केली.

Badalapur Rape Case | “….म्हणून गुप्तांगावर जखमा”; बदलापुरातील शाळेच्या मुख्यध्यापिकेचा संतापजन्य दावा

अत्याचारांचे सत्र संपत नाही

बदलापूर, कोलकत्ता येथील घटना ताज्या असतानाच राज्यातून अत्याचाराच्या रोज नवनवीन घटना समोर येत आहेत. विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यामध्ये शाळेच्या व्हॅन चालकाने शाळकरी मुलीला “तू मला आवडतेस” असा मेसेज करत छेडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिला प्रत्यक्षात गाठून त्याचबरोबर इंस्टाग्राम वर सतत मेसेज करून त्रास दिलाचा प्रकार उघडकीस आला आहे.

या अश्लील व्हॅनचालकावर फॉक्से कायद्याअंतर्गत डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संपूर्ण घटनेची मनसे कार्यकर्त्यांना बातमी लागताच त्यांनी या व्हॅनचालकाला चांगलाच धडा शिकवत पोलिसांच्या हवाले केलं.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here