Skip to content

Praniti Shinde | ज्यांच्यासाठी मोदी महाराष्ट्रात आले, आता त्यांचा काँग्रेसला पाठिंबा

Praniti Shinde

Praniti Shinde |  सध्या राज्यासह संपूर्ण देशात निवडणुकींचा मौसम असून, या काळात कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. दरम्यान, अशीच एक मोठी बातमी सोलापूरमधून समोर आली आहे. ज्यांच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतून सोलापुरात आले. त्यांनीच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि काँग्रेसच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्राणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.

त्यामुळे आता भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या विरोधात काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांची ताकद आणखी वाढली आहे. विधानसभा निवडणुकीतील प्राणिती शिंदे यांचे कट्टर विरोधक असलेले सोलापूरचे माकपचे माजी आमदार नरसय्या आडम म्हणजेच आडम मास्तर यांच्यासोबतची दुशमनी आता प्राणिती शिंदेंनी दोस्तीत बदलली असून, आडम मास्तरांनी लोकसभेसाठी पाठिंबा जाहीर केल्यामुळे प्राणिती शिंदेंची ताकद दुपटीने वाढणार आहे.(Praniti Shinde)

Loksabha Election | ना गोडसे, ना भुजबळ; नव्या सर्वेक्षणात नव्या नावांची चर्चा

सोलापूरमध्ये काँग्रेसच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे माळशिरसचे विद्यमान आमदार राम सातपुते यांच्यात जोरदार लढत रंगली आहे. दरम्यान, यातच आता माकपच्या माजी आमदारांनी दिलेल्या या पाठिंब्यामुळे प्राणिती शिंदेंचे पारडे नक्कीच जड होणार आहे. प्रणिती शिंदे यांनी नरसय्या आडम यांची माकप पक्ष कार्यालयात भेट घेतली होती. यावेळीच नरसय्या आडम यांनी प्रणिती शिंदेंना आपला पाठिंबा असल्याचे आश्वासन देत कामगार आपल्या पाठीशी असतील असा शब्दही दिला आहे.  (Praniti Shinde)

Praniti Shinde | कट्टर विरोधक प्राणिती शिंदेंच्या मदतीला   

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड नरसय्या आडम हे प्रणिती शिंदेंचे कट्टर विरोधक असून, आडम मास्तर आतापर्यंत  1978, 1995, 2004 च्या निवडणुकीत सोलापूर शहरातून सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. मात्र, 2009 च्या निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी त्यांचा पराभव केला होता. जाई जुई विचार मंचाच्या माध्यमातून सोलापुरात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रणिती शिंदे या 2009 मध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि आपल्या पहिल्याच निवडणुकीत त्यांनी तत्कालीन आमदार नरसय्या आडम यांचा दारून पराभव केला.(Praniti Shinde)

Loksabha Candidate | राज्यातील काँग्रेसचे उमेदवार जाहीर

एवढेच नाहीतर, त्यानंतर 2014 आणि 2019 च्या निवडणुकीतही प्रणिती शिंदेंनी आडम मास्तरांचा पराभव केला होता. त्यामुळे प्रणिती शिंदे आणि नरसय्या आडम हे एकमेकांचे कट्टर विरोधक असून, लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आडम यांचा काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या या निर्णयानंतर आता सोलापूरच्या मैदानात आणखी काय घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Praniti Shinde)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!