Loksabha Candidate | राज्यातील काँग्रेसचे उमेदवार जाहीर

0
2
Loksabha Candidate
Loksabha Candidate

Loksabha Candidate | देशात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून, या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसून प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजपने याधीच उमेदवारांच्या २ याद्या जाहीर केल्या होत्या. दरम्यान, आता काँग्रेसनेही महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, यात कोल्हापुर मतदार संघातून छत्रपती शाहू महाराज आणि पुण्यातून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Loksabha Candidate)

या यादीत राज्यातील ७ जागांवरील उमेदवार जाहित करण्यात आले असून, यात आमदारांना खासदारकीची संधी देण्यात आली आहे. तर, पुण्यातून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. अनेक दिवसांपासून ज्याबाबत चर्चा सुरू होती. त्या कोल्हापूरच्या जागेवर शाहू महाराज छत्रपती यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. तर नंदुरबारमधून गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.(Loksabha Candidate)

Loksabha Election | आमदारांना खसदारकीची संधी; काँग्रेसचे ‘हे’ उमेदवार निश्चित

काँग्रेसने महाराष्ट्रातील एकूण ७ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तर, उर्वरित उमेदवारांची घोषणाही लवकरच होणार असल्याची माहिती समोर आहे. महाविकास आघाडीच्या सूत्रानुसार महाराष्ट्रात काँग्रेसच्या वाट्याला ४८ पैकी १८ जागा आल्या असून, यापैकी ७ जागा आणि उमेदवारांची घोषणा झाली आहे. दरम्यान, आता महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष हे किती, आणि कोणत्या जागांवर लढणार आणि त्यांचे उमेदवार कोण असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.(Loksabha Candidate)

Loksabha Candidate | अशी आहे काँग्रेसची उमेदवारांची यादी 

  1. सोलापूर – आमदार प्रणिती शिंदे
  2. कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती
  3. पुणे – आमदार रवींद्र धंगेकर
  4. नंदुरबार – गोवाल पाडवी
  5. अमरावती – वळवंत वानखेडे
  6. लातूर – डॉ. शिवाजी कलगे
  7. नांदेड – वसंतराव चव्हाण(Loksabha Candidate)

BJP loksabha Candidate | भाजपाची दुसरी यादी जाहीर; भारती पवार आणि सुभाष भामरे यांनाच पुन्हा उमेदवारी

मोदींकडे बघून लोक आता मतदान करणार नाही

सोलापूर मतदार संघातून माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि विद्यमान आमदार प्राणिती शिंदे यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की,”ही लढाई लोकशाहीसाठी असून, ही सर्वांचीच लढाई आहे. प्रत्येक गावपातळीवर फिरल्यावर भाजपच्या विरोधात जनतेचा रोष किती आहे हे लक्षात येते. त्यामुळे नक्कीच यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या खासदारांची ही संख्या वाढलेली दिसेल”, असा विश्वास प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला. (Loksabha Candidate)

तसेच त्या म्हणाल्या की, “भाजपने जनतेचा विश्वासघात केला आहे त्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे आता लोकांनीच ठरवलं आहे. संपूर्ण देशात इंडिया आघाडीच्या उमेदवारांनाच नागरीक जास्तीत जास्त मतदान करतील. भाजपची घोषणा ही फक्त ४०० ची आहे. मात्र वास्तविक पाहता गावपातळीवर लोक त्यांच्यावर प्रचंड चिडले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बघून लोक आता मतदान करणार नाहीत’, असं यावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या.(Loksabha Candidate)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here