Sharad Pawar | शरद पवारांची मोठी घोषणा; ‘मी यापुढे कधीही…’

0
1
Sharad Pawar
Sharad Pawar

Sharad Pawar | राज्यात आगामी लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपापली शक्ती पणाला लावली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पुणे किंवा माढाच्या जागेवर शरद पवार स्वतः निवडणूक लढवतील असे बोलले जात होते. मात्र, आता अशातच शरद पवार यांनी लोकसभा लढवण्याच्या निर्णयाबाबत स्पष्टच सांगितले. शरद पवारांनी या चर्चांना पूर्णविराम दिला असून, “मी यापुढे कधीच निवडणूक लढवणार नाही”, असं त्यांनी जाहीर केलं आहे. (Sharad Pawar)

आपण माढातून निवडणूक लढवणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे. शरद पवार कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवतील याची सर्वांनाच उत्सुकता होती. यात पुणे किंवा माढा या जागांबाबत शक्यता वर्तविली जात होती. दरम्यान, मी यापुढे कधीच कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. (Sharad Pawar)

Sharad Pawar | लेकीसाठी पवारांची ३१ वर्षांचे वैर विसरून कट्टर विरोधकासमोर माघार

देशातील मोठ्या पक्षाचा प्रचार थांबवण्याचा प्रयत्न 

काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांच्या अटकेच्या प्रकरणावरही शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून, ते म्हणाले की, “देशात सध्या ईडी, सीबीआय या एजन्सींचा गैरवापर सुरु आहे. अकाऊंट फ्रिज करणं या प्रकाराद्वारे देशातील एका मोठ्या पक्षाचा प्रचार थांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याआधी झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनाही अटक केली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं जात आहे, त्यांच्यावर कारवाई केली जातेय. (Sharad Pawar)

Sharad Pawar | मी तीव्र निषेध करतो

देशात कोणत्याही पक्षात अशी कारवाई याआधी झाली नव्हती. कुठल्याही राज्याच्या प्रमुखांना अटक करणं हे अगदी चुकीचं आहे. हे अगदी लाजिरवाणं सरकार आहे. सत्येचा गैरवापर करणं या सर्व गोष्टींचा मी तीव्र निषेध करतो.” तसेच, आम्ही अरविंद केजरीवाल यांच्या मागे पूर्ण ताकदीने उभे राहणार असल्याचंही यावेळी शरद पवार म्हणाले.

“एका चांगल्या व्यक्तीला तुम्ही तुरुंगांत टाकलंय. लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून सुरु आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहील. १०० टक्के ही कारवाई निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. झारखंड झालं, आणि आता दिल्ली अशाच पद्धीतीनं ही कारवाई होते आहे.” (Sharad Pawar)

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला ‘तुतारी’

…हा त्यांचा अधिकार होता.

“आजपर्यंत देशात काही अपवाद वेगळलेत. तर निवडणूका या अगदी मोकळ्या वातावरणात पार पडल्या आहेत. मात्र आता निवडणूका या किती फेअर होईल या याबाबत शंका आहे. काँगेसची खाती गोठवली जाताय. देशातील महत्त्वाच्या पक्षाकडेच साधनसामग्री नाहीये. याआधी असं कधीही झालं नव्हतं. केजरीवाल यांना वाटतच होतं की काहीतरी होईलच, आणि केजरीवाल यांना अटक केली. त्यांनी राज्यात धोरण तयार केलं हा त्यांचा अधिकार होता. त्यांचे धोरण चुकले असेल तर लोकांसमोर जा, कोर्टात जा पण त्यांनी तसे न करता त्यांना अटक केली आणि हे अत्यंत चुकीचं आहे.”, असं यावेळी शरद पवार म्हणाले. (Sharad Pawar)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here