Govinda In Shivsena | बॉलिवुड अभिनेता गोविंदा शिंदेसेनेत; या जागेवरून निवडणूक लढवणार

0
1
Govinda In Shivsena
Govinda In Shivsena

Govinda In Shivsena |  लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता अक्षय कुमार आणि क्रिकेटर युवराज हादेखील भाजपकडून लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती. दरम्यान, आता गोविंदा हा शिवसेना शिंदे गटातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Govinda In Shivsena)

अभिनेता गोविंदा याने याधीही निवडणूक लढवली असून, आता ते शिंदेसेनेतून पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरणार आहे. मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून गोविदा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटात त्यांचा आता लवकरच पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. (Govinda In Shivsena)

Loksabha Candidate | राज्यातील काँग्रेसचे उमेदवार जाहीर

Govinda In Shivsena | मुख्यमंत्र्यांची घेतली होती भेट 

दरम्यान, अभिनेता गोविंदा आहुजा हा उत्तर पश्चिम मुंबई या लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर आली असून, लवकरच गोविंदा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश करणार आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी अभिनेता गोविंदाने मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेटदेखील घेतल्याची माहिती समोर आली आहे. याच उत्तर पश्चिम मतदार संघातून महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांची उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली होती. दरम्यान, या उमेदवाराला जोरदार लढत देण्यासाठी अनुभवी उमेदवार असावा, यामुळे अभिनेता गोविंदा याला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. (Govinda In Shivsena)

Loksabha Election | आमदारांना खसदारकीची संधी; काँग्रेसचे ‘हे’ उमेदवार निश्चित

गोविंदानं याआधीही लोकसभा लढवली होती…. 

दरम्यान, अभिनेता गोविंदा आहुजा याने २००४ मध्ये उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. यावेळे त्याने भाजपच्या राम नाईकांचा अभेद्य गड पाडला होता. गोविंदाने भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या या मतदार संघात काँग्रेसला अभूतपूर्व विजय मिळवून दिला होता. संपूर्ण जगभरात अभिनेता गोविंदाचा मोठा चाहता वर्ग असून, यसह त्याला राजकिय क्षेत्राचीही जाण आहे. त्यामुळे ठाकरेंचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्या विरोधात गोविंदाला मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. ठाकरेंचा उमेदवार हा विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांचा मुलगा आहे. (Govinda In Shivsena)

गजानन किर्तीकर यांच्यासमोर गोविंदा एक तागडे आव्हान ठरेल का? याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, यापूर्वी या जागेवर अभिनेता अक्षय कुमार, माधुरी दिक्षीत, नाना पाटेकर यांनाही महायुतीकडून विचारणा करण्यात आली होती. मात्र अक्षय कुमार व नाना पाटेकर यांनी राजकारणात येण्यास नकार दिल्याने गोविंदा याला तिकीट देण्यासाठीची चाचपणी शिंदे गट करत आहे. (Govinda In Shivsena)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here