Skip to content

Nashik News | नाशिकमध्ये स्थानिक- परप्रांतीय वाद; राजस्थानी व्यापाऱ्यांची केंद्र सरकारकडे धाव

Nashik News

Nashik News |  नाशिक हे सध्या अनेक राजकीय वादांमुळे चर्चेत आहे. यात नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून स्थानिक आणि परप्रांतीय वादाची भर पडली आहे. नाशिक शहरातील एम.जी रोडवरील मोबाईल मार्केट येथे स्थानिक व्यापारी आणि परप्रांतीय हा वाद सुरू असून, या वादामुळे मोबाईल मार्केट बंद होते. यामुळे गेल्या काही दिवसांपासून येथील लाखोंची उलाढाल ठप्प होती. काल मार्केट उघडले असता मनसेने राजस्थानी मोबाईल व्यापाऱ्यांच्या दुकानांचे फलक फाडले. (Nashik News)

राजस्थानी मोबाईल व्यापाऱ्यांचे एमजी रोड येथील मोबाइल मार्केटमध्ये जवळपास २५० मोबाईल रिपेअर, स्पेअरपार्ट व नवीन मोबाईल विक्री दुकाने असून, संपूर्ण जिल्हाभरातील मराठी मोबाईल व्यावसायिक हे एम.जी रोडवरील या राजस्थानी व्यापाऱ्यांकडून होलसेल भावात मोबाईल ऍक्सेसरीज आणि मोबाईल खरेदी करतात. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी एका मराठी व्यावसायिकासोबत वाद झाला असता, या वादानंतर येथील राजस्थानी व्यापाऱ्यांनी एकत्र येत त्याच्यावर बहिष्कार टाकला. यामुळे नाशिकमध्ये स्थानिक आणि परप्रांतीय वाद पेटला होता. (Nashik News)

Nashik Loksabha | आचारसंहिता भंगाची पहिलीच तक्रार विद्यमान खासदारांच्या नावे

Nashik News | मनसेने दुकानांचे फलक फाडले 

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर काल नाशिकमधील मनसे पदाधिकाऱ्यांनी या परप्रांतीय व्यापऱ्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घतेली. तर, यावेळी मनसेकडून येथील राजस्थानी मोबाईल व्यापाऱ्यांच्या दुकानांचे फलक फाडण्यात आले आहेत. तसेच येथील राजस्थानी व्यापारी हे स्थानिक मराठी व्यापाऱ्यांवर अन्याय करत असल्याचे स्पष्टीकरणही मनसेकडून देण्यात आले आहे. या प्रकारानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. (Nashik News)

एमजी रोडवरील लाखोंची उलाढाल ठप्प

नाशिक शहरातील एम जी रोड येथील मोबाइल मार्केट परिसरात ग्राहक, किरकोळ विक्रेते येथे मोठ्या प्रमाणात मोबाइल ऍक्सेसरीज खरेदी करतात. त्यामुळे या परिसरात अनेक छोटे-मोठे व्‍यावसायिक कार्यरत असून, ही दुकाने दोन-ते तीन दिवस बंद असल्‍याने मार्केटमधील तब्बल ७० ते ८० लाखांची उलाढाल ही गेल्या काही दिवसांपासून ठप्प झाली आहे. (Nashik News)

Nashik Loksabha | नाशिकच्या जागेसाठी भाजप कार्यकर्त्यांचे कार्यालयात ठिय्या आंदोलन

राजस्‍थानी व्‍यावसायिकांकडून केंद्र शासनाकडे तक्रार 

दरम्यान, हा वाद टोकाला गेल्याने यात पोलिसांनी मध्यस्थी करत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या स्पष्ट सूचना या व्यावसायिकांना दिल्या असून, येथील राजस्‍थानी व्‍यावसायिकांनी आपल्‍या मूळगावी असलेल्‍या लोकप्रतिनिधींच्‍या माध्यमातून थेट केंद्र शासनाकडे निवेदनाद्वारे या प्रकाराची तक्रार केल्‍याचीही माहिती समोर आली आहे. तसेच येथील स्थानिक भाजप आमदार देवयानी फरांदे यांनीही या वादात मध्यस्थी केली असल्याची माहिती समोर आली असून, त्यांनी या परप्रांतीय व स्थानिक व्यापाऱ्यांची बैठक घेतली असल्याचे वृत्त समोर आले आहे. (Nashik News)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!