Shani Dev | शनिवारच्या दिवशी चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी

0
1
Shani Dev
Shani Dev

Shani Dev | हिंदू धर्म शास्त्रानुसार आठवड्याचा प्रत्येक वार हा देवी देवतांना समर्पित असतो. जसा, सोमवार हा भगवान शंकराला समर्पित असतो किंवा मंगळवार हा देवी पार्वतीला समर्पित असतो. तसंच शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. आजच्या म्हणजेच शनिवारच्या दिवशी शनिदेवाची विधीवत पूजा केल्याने साडेसाती आणि शनि वक्रीच्या अडचणी कमी होतात. तसेच मनातील सर्व इच्छाही पूर्ण होतात. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारच्या दिवशी काही गोष्टी करणे हे वर्ज्य आहे. या गोष्टी केल्यास शनिदेव क्रोधित होतात व त्या व्यक्तीची अधोगती होते असे सांगितले जाते. तर, नेमक्या कोणत्या गोष्टी शनिवारी टाळायला हव्यात? हे आज आपण जाणून घेऊयात… (Shani Dev)

Shani Dev | शनिवारी ‘ही’ कामे असतात वर्ज्य

१. केस धुवू नका किंवा दाढी करू नका

काही लोक रोज केस धुतात. मात्र, शनिवारच्या दिवशी केस धुवू नये, असे शास्त्रात सांगितले आहे. तसेच शनिवारच्या दिवशी पुरुषांनी दाढी करू नये, अन्यथा त्या व्यक्तीस शनि दोष होतो.(Shani Dev)

२. शनिवारी नखं कापू नये

शनिवारच्या दिवशी चुकूनही नखं कापू नका. अन्यथा त्याचा आर्थिक गोष्टींवर आणि घरावर वाईट परिणाम होतो. शनिवारी नखं कापल्यास घरात दारिद्र्य येते, असे म्हटले जाते.

Shani Dev | वर्षातील शेवटच्या शनिवारी शनिदेवांना ‘अशा’ प्रकारे करा प्रसन्न

३. मोहरीचे तेल खरेदी करू नये

ज्योतिष शास्त्रानुसार, शनिवारी मोहरीचे तेल किंवा इतर कोणतेही तेल खरेदी करू नका. या दिवशी कोणतेही तेल खरेदी केल्यास घरात दारिद्र्य येते, मात्र शनिवारी तेलाचं दान करणे चांगलं असतं. विशेषतः शनिवारी मोहरीच्या तेलाचे दान करणे हे शुभ असतं. (Shani Dev)

४. मीठ खरेदी करू नका

शनिवारी मीठही खरेदी करू नये. शनिवारी मीठ घरी आणणं हे शास्त्रानुसार अशुभ असतं. या दिवशी मीठ खरेदी केल्याने त्या व्यक्तीवारील कर्ज वाढते आणि रोगही बळावू शकतात. त्यामुळे शनिवारी मीठ खरेदीही करू नये किंवा आपल्या घरातील मीठही कुणाला देऊ नये.

५. शनिदेवाच्या डोळ्यात बघू नये

शनिवारी शनि देवाचे दर्शन घेणे हे शुभ असते. मात्र, जर मंदिरात जात असाल तर लक्षात ठेवा की चुकूनही शनि देवाच्या डोळ्यांमध्ये पाहू नका. कारण हा शनिदेवाचा अपमान मानला जातो.  यामुळे शनिदेव त्या व्यक्तीवर नाराज होतात.(Shani Dev)

Shani Dev: शनिदेव या राशीच्या लोकांना करत नाही माफ

६. शनिवारी मांसाहार करू नये 

ज्योतिष शास्त्रानुसार, आठवड्यातील काही दिवस हे मांसाहारासाठी वर्ज्य असतात. त्यात शनिवारचाही दिवस आहे. शनिवारी कोणत्याही प्राण्याला किंवा पक्ष्याला त्रास देऊ नये. शनिवारी कोणत्याही प्राण्याला मारल्याने किंवा त्याला यातना पोहोचवल्यास त्या व्यक्तीवर शनिचा कोप होतो, असे मानले जाते. त्यामुळे शनिवारच्या दिवशी गरजूंना मदत करावी. यामुळे तुम्हाला शनि देवांचा आशीर्वाद मिळतो आणि साडेसाती किंवा शनि वक्रीचा त्रासही कमी होतो. (Shani Dev)

 

(टीप : वरील सर्व बाबी ‘द पॉइंट नाऊ’ हे केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून, याद्वारे आम्ही कोणताही दावा करत नाही.)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here