Shani Dev | वर्षातील शेवटच्या शनिवारी शनिदेवांना ‘अशा’ प्रकारे करा प्रसन्न

0
20
Shani Dev
Shani Dev

Shani Dev | हिंदू धर्माच्या मान्यतेप्रमाणे, शनि देव म्हणजे न्यायाची देवता. शनि देवांना (Shani Dev) ‘कर्मफलदाता’ असेही म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, शनि हा ग्रह अत्यंत शिस्तप्रिय आणि कठोर ग्रह मानला जातो. शनिदेव हे आपल्या भक्तांना त्यांच्या कर्माप्रमाणेच फळं देत असतात. दरम्यान, २०२३ ह्या वर्षातील शेवटचा शनिवार हा आज आहे. त्यामुळे जर तुम्हाला या दिवशी शनिदोषाचा त्रास होत असेल तर या वर्षाच्या शेवटच्या शनिवारी हे पुढील खात्रीशीर उपाय करा.

शनिदेवाच्या कृपेचे महत्त्व

ज्योतिषशास्त्राप्रमाणे, शनि देवांच्या कृपेचे आपल्या जीवनात विशेष महत्त्व आहे. ‘कलयुगाचा दंडाधिकारी’ असे शनि देवाचे वर्णन केलेले आहे. तसेच यानुसार शनि देव हे ज्याच्या त्याच्या कर्मानुसार फळ देतात. त्यामुळे हिंदू धर्मात शनि देवांच्या पूजेला आणि कृपेला अत्यंत महत्त्व आहे. शनिवार हा वार शनिदेवांना समर्पित असल्याने या दिवशी त्यांची पूजा केल्याने त्यांची कृपा होते.(Shani Dev)

तसेच जर एखाद्या व्यक्तीने दर शनिवारी पूर्ण भक्तिभाव आणि निर्मळ मनाने शनि देवाची पूजा केली तर शनिदेव त्याच्यावर प्रसन्न होतात व त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. ज्योतिषशास्त्राप्रमाणे, कर्म घराचा स्वामी हा शनि असून, त्यामुळे शनिच्या शुभ किंवा अशुभ प्रभावामुळे नोकरी व व्यवसायात प्रगती किंवा अधोगती ही होते. पण, शनि अशुभ स्थानी असेल तर आपल्याला जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. दरम्यान, अशावेळी शनि प्रदोष ह्या व्रताचे व्रत व पूजन हे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. (Shani Dev)

Spiritual news | उज्जैनच्या मंदिराचे अद्भूत रहस्य; मूर्ती प्राषण करते…

Shani Dev |’हे’ आहेत उपाय 

१. आज वर्षाचा  शेवटचा शनिवार आहे. तर, या दिवशी शनि देवाच्या मंदिरात जावे आणि शनि देवाचे दर्शन घेऊन शनि देवाला मोहरीच्या तेलाचा व काळ्या तिळाचा अभिषेक करावा, असे केल्याने शनिच्या दोषापासून मुक्ती मिळण्यास मदत होते.

२. तसेच, कुंडलीत असलेल्या शनि दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आज शनि देवांच्या मंदिरात जाऊन पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे.

३. जर शनिची साडेसाती किंवा शनिच्या ढैय्या सुरू असेल. तर २०२३ या वर्षाच्या शेवटच्या शनिवारी गरजवंत लोकांना काळ्या रंगाचे ब्लँकेट दान करावे, असे केल्याने शनिदेवांची विशेष कृपया होते.(Shani Dev)

Spiritual news | असे आहे कालभैरव जयंतीचे महत्त्व; वाचा सविस्तर

४. सोबतच काळे तीळ, उडीद डाळ, बूट किंवा चप्पल हे गरजू लोकांना दान करावे. तसेच या वर्षाच्या शेवटच्या दिवशी शनि चालिसाचे पठन अवश्य करावे, असे केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल.

(टीप – वरील सर्व बाबी ‘द पॉइंट नाऊ’ हे माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असते. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here