Chandwad | नाशिक जिल्ह्यात सध्या अनेक लाचखोरीची प्रकरणं समोर येत आहेत. ह्या वर्षात नाशिकमधील अनेक मोठमोठे अधिकारी तथा व्यापारी हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ अडकले आहेत. दरम्यान, आता पुन्हा नाशिकच्या चांदवडमधील सोग्रस येथील सरपंच व उपसरपंच यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. (Chandwad)
ग्रामपंचायतींची किंवा जिल्हा परिषदेच्या कामांचे कंत्राट हे आपल्या पसंतीच्या ठेकेदारांना देण्याची पद्धत सुरू आहे. दरम्यान, याचमुळे कामांचे ‘ई-टेंडर’ ही पद्धत आली असली, तरीदेखील आपल्या पसंतीच्या ठेकेदारांनाच ही कामे अद्यापही दिली जात असतात. आणि ह्या पसंतीच्या किंवा मॅनेज असलेल्या ठेकेदारांकडून काम मिळवून देणारी व्यक्ती ही कामिशनची मागणी करते. दरम्यान, टक्केवारीच्या कामांच्या पैशांच्या आशेमुळे या कामांची गुणवत्ताही त्याच दर्जाची असते. (Chandwad)
Thirty First | ‘थर्टी फर्स्ट’ला दारू पिताय तर सावधान…!
पाण्याच्या टाकीच्या बिलाची रक्कम काढण्यासाठी व हस्तांतर पत्रावर सही करण्यासाठी संबंधित सरपंच आणि उपसरपंच यांनी कंत्राटदारांकडून पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती. दरम्यान, हीच लाच स्वीकारताना चांदवड तालुक्यातील सोग्रस येथील सरपंच आणि उपसरपंच हे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकले. या प्रकरणी, सोग्रस येथील सरपंच भास्कर पुंडलिक गांगुर्डे आणि उपसरपंच प्रकाश चंद्रभान गांगुर्डे अशी या आरोपींची नावे आहेत.
Chandwad | नेमकं प्रकरण काय..?
अधिक माहितीनुसार, संबंधित कंत्राटदाराकडे तब्बल पन्नास हजार रुपयांची मागणी ह्या लोकप्रतिनिधींनी केली होती. ही तक्रार मिळाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात सापळा रचला. आरोपी सरपंच आणि उपसरपंच यांनी हस्तांतर पत्रावर सही करून पाठविण्यासाठी पंचांच्या समोरच संबंधित तक्रारदाराकडे तब्बल ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली असून, तडजोड करत ती ३० हजार रुपये इतकी मान्य करत ती पंचासमक्ष स्वीकारली होती.(Chandwad)
Big News | ठाकरे-शिंदे भेटीबाबत ‘या’ बड्या नेत्याचा गौप्यस्फोट
तसेच, या प्रकरणी तक्रारदार यांच्या मित्राने जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सोग्रस या गावात पाण्याच्या टाकीचे बांधकाम हे पूर्ण केले असून, सदर टाकीच्या बांधकामाचे बिल हे अजूनही मिळाले नव्हते. दरम्यान, हेच प्रलंबित बिल काढण्यासाठी तक्रारदारांना अधिकारपत्र हे प्राप्त होते.(Chandwad)
तसेच, ह्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचे बिल हे मंजूर करण्यासाठी हे लोकप्रतिनिधींनी लाच मागितली असता, ती स्वीकारताना यांना ताब्यात घेण्यात आले आहे. उपअधीक्षक अनिल बडगुजर, दिपक पवार, संजय ठाकरे यांच्या विशेष पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर-अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई केली आहे.(Chandwad)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम