Skip to content

Deola | राष्ट्रपती पदक पुरस्कृत उपनिरीक्षक विनय देवरे यांचा वाय.बी.एस ग्रुपतर्फे सत्कार

Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  देवळा शहरासह ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्या बरोबरच सर्वसामान्य नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर योग्य निवाडा केल्याने येथील सहायक पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे यांना राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित करण्यात आल्याने देवरे यांनी देवळा पोलीस ठाण्याच्या नावलौकिकात भर पाडली असून, ही अभिमानास्पद बाब असल्याचे गौरवोद्गार येथील माजी सरपंच व वाय.बी.एस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रघु नवरे यांनी केले.(Deola)

देवळा पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव तसेच सहायक पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे यांना राष्ट्रपती पदक पुरस्काराने नुकतेच पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आल्याने वाय.बी.एस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व माजी सरपंच रघु नवरे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संघटनेचे दादा जाधव, गणेश खैरनार, सुनील गांगुर्डे, समाधान सोनवणे, उखा वाघ, काळू पवार, नानु सोनवणे, अंबादास आहिरे, सुरेश जाधव, प्रकाश जाधव, भाऊसाहेब जाधव, युवराज वाघ, आबा पिंपळसे आदी उपस्थित होते.(Deola)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!