Shivajirao Adhalarao Patil | शिंदेंना धक्का..!; खासदारकीसाठी बडा नेता अजित पवारांसोबत

0
1
Shivajirao Adhalarao Patil
Shivajirao Adhalarao Patil

Shivajirao Adhalarao Patil |  आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. अनेक नेते आपापल्या सोयीनुसार पक्ष प्रवेश करत आहेत. यातच आता शिंदे गटाच्या आणखी एका नेत्याचा नंबर लागला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला असून, खासदारकीच्या तिकीटासाठी त्यांच्या बड्या नेत्याने अजित पवार गटाची वाट धरली आहे. (Shivajirao Adhalarao Patil)

शिरूर (shirur) लोकसभेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे आज अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या निवासस्थानी आढळराव पाटील यांचा पक्षप्रवेश होणार आहे. यावेळी मंत्री दिलीप वळसे पाटील व अजित पवार गटाचे आजी-माजी आमदार यांच्यासह पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना अजित पवारांनी मुंबईत बोलावलं आहे. (Shivajirao Adhalarao Patil)

Shirur : मी पवार साहेबांसोबतच ; अवघ्या एक दिवसात अमोल कोल्हेंचे घुमजाव…

अमोल कोल्हे यांच्या विरोधात लढणार 

गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी अमोल कोल्हे यांना खासदार बनवण्यासाठी मी खूप कष्ट घेतले, मात्र आता ते खासदार होणार नाहीत, असे वक्तव्य त्यांचे नाव न घेता केले होते. दरम्यान, यानंतर शिरुर लोकसभेची ही जागा अजित पवारांसाठी प्रतिष्ठेचा विषय असणार आहे. दरम्यान, महायुतीत या जागेसाठी अजित पवार गट आग्रही असून, ही जागा त्यांनाच मिळण्याची शक्यता आहे आणि शिंदे गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील हे या जागेवरुन निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे शिवाजी आढळराव पाटलांचा अजित पवार गटात पक्षप्रवेश करून अमोल कोल्हेंच्या विरोधात त्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची महायुतीची तयारी आहे. (Shivajirao Adhalarao Patil)

२०१९ मध्ये कोल्हेंसमोर पराभव स्वीकारावा लागला  

२०१९ च्या निवडणुकीत शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात शिवसेनेच्या तिकिटावर लढणाऱ्या शिवाजी आढळराव पाटलांना दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी अमोल कोल्हे यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत ही निवडणूक लढवली होती. दरम्यान, या निवडणुकीत आता पुन्हा एकदा अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. (Shivajirao Adhalarao Patil)

Amol kolhe : खुशखबर…राज्यात गिर्यारोहण इन्स्टिट्यूट होणार! खा.अमोल कोल्हे यांच्या मागणीला यश!

Shivajirao Adhalarao Patil |  कोण आहेत शिवाजी आढळराव पाटील?

शिवाजी आढळराव पाटील हे मूळचे पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं आहे. २००४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. त्यानंतर २००४, २००९ आणि २०१४ मध्ये त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली आणि सलग तीन वेळेस ते निवडूनही आले. मात्र २०१९ मध्ये त्यांना अमोल कोल्हेंसमोर पराभव स्वीकारावा लागला. (Shivajirao Adhalarao Patil)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here