Manoj Jarange | जरांगेंनी बोलावली बैठक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेणार

0
3
Manoj Jarange
Manoj Jarange

Manoj Jarange |  गेल्या महिन्यात 20 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण दिले. मात्र, मराठा आंदोलक मनोज जरांगे हे ओबीसीतून आरक्षण घेण्यावर आणि सगेसोयऱ्यांची मागणी मान्य करण्यावर ठाम आहेत. दरम्यान, त्यांनी उपोषण स्थगित केले असले. तरी राज्यभरात त्यांच्या सभा या सुरू आहेत. गेल्या केही दिवसांत स्वतः मनोज जरांगे यांच्यावर आणि त्यांच्या सभांचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, या आणि आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक बोलावली आहे. (Manoj Jarange)

Manoj Jarange | मनोज जरांगे आणि अशोक चव्हाण यांची भेट; अन् जरांगेंनी केली मोठी घोषणा

  तर, आजच्या या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. सोबतच, येत्या काही दिवसांत पुन्हा एकदा तब्बल ९०० एकरांवर मराठा समाजाची भव्य सभा होणार असून, त्या सभेबाबतही आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या आजच्या या राजस्तरीय बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार  आहे. सोबतच आजच्या सभेत मनोज जरांगे मराठा समाजाच्या पुढील आंदोलनाबाबत कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आज शेवटचा निर्णय घेणार असून, यासाठी २४ मार्चला आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीची घोषणा जरांगे यांनी केली होती. (Manoj Jarange)

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेणार? 

लोकसभा निवडणूक आता अगदी तोंडावर येऊन ठेपली असून, अजूनही सरकारने सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन मराठा उमेदवार उभे करण्यास मनोज जरांगे यांनी याआधी सांगितले होते. त्यामुळे आजच्या बैठकीतही मनोज जरांगे हे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही मोठा निर्णय घेऊ शकतात. (Manoj Jarange)

Manoj Jarange | जरांगेंवर आणखी एक गुन्हा दाखल; अटकेची शंका खरी ठरणार..?

Manoj Jarange | मराठ्यांच्या भव्य सभेची घोषणा…

सगेसोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी मनोज जरांगे हे करत आहेत. मात्र, अद्यापही सरकारने याबाबत कुठलाही निर्णय घेतला नसून त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठा समाजाची ९०० एकरवर जाहीर सभा घेण्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे. दरम्यान, या सभेबाबत महत्त्वाचा निर्णय आजच्या या बैठकीत घेतला जाणार आहे. तर, विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकींआधी ही सभा होत असल्याने या सभेला अधिक महत्व प्राप्त झाले असून, या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे काही मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Manoj Jarange)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here