Skip to content

Manoj Jarange | मनोज जरांगे आणि अशोक चव्हाण यांची भेट; अन् जरांगेंनी केली मोठी घोषणा

Manoj Jarange

Manoj Jarange | नुकतेच कॉँग्रेससमधून भाजपमध्ये दाखल झालेले भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली आहे. तर, यावेळी या दोघांमध्ये जवळपास एक तास राठा आरक्षणातील मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहीती आहे. मात्र, तर सरकारचा भाग म्हणून नाही तर मराठा समाजाचा एक भाग म्हणून आपण मनोज जरांगे यांनी भेटायला आणि तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आल्याचे अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले. तसंच पुढच्या बैठकीबाबतही जरांगे यांनी सांगितले आहे. (Manoj Jarange)

काय म्हणाले अशोक चव्हाण..?

सुरुवातीला उद्धव ठाकरे आणि मी येथे आलो होतो. त्यावेळी जरांगे यांची भेट झाली होती. हा संपूर्ण मराठा समाजाचा विषय असून, यावर चर्चा करून मार्ग निघाला पाहिजे. ही माझी वायक्तिक भूमिका आधीपासूनच आहे. सध्याच्या स्थितीवर मार्ग कसा काढायचा? याबाबत मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी मी येथे आलो होतो. मराठा आरक्षण आणि लोकसभा निवडणूक यांचा काहीही विषय नाही आणि मी उमेदवारदेखील नाही. जरांगे पाटील यांच्या मागण्या या समाजाच्या मागण्या आहेत आणि त्या रास्त असून, यावर तोडगा निघालाच पाहिजे. अशी माझी भूमिका आहे. (Manoj Jarange)

Manoj Jarange | जरांगेंवर आणखी एक गुन्हा दाखल; अटकेची शंका खरी ठरणार..?

२४ मार्च रोजी होणार निर्णायक बैठक

आम्ही २४ मार्च रोजी महाराष्ट्रातील मराठा समाजाचे साखळी उपोषणकर्ते, आमरण उपोषणकर्ते, स्वयंसेवक, मराठा समाजाच्या आणि मनोज जरांगे यांच्या सभांचे आयोजक आणि मराठा समाज बांधव यांची बैठक घेणार आहोत. २४ मार्च रोजी सकाळी १० वाजता अंतरवाली सराटी येथे ही बैठक होणार आहे. यात पुढील दिशा ठरवणार असून, ही बैठक निर्णायक होणार आहे. त्यांनी त्यांची भूमिका ठरवली असून, जातीशी गद्दारी करणारी ही आपली औलाद नसून, आता तुम्हाला सुट्टी नाही. २४ मार्चला निर्णायक भूमिका ठरवणार आणि तुकडा पाडणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केली. (Manoj Jarange)

Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी; फडणवीस म्हणाले…

Manoj Jarange | काय म्हणाले मनोज जरांगे पाटील..?

अशोक चव्हाण यांच्या भेटीबाबत मनोज जरांगे म्हणाले की,” ते एक समाज म्हणून भेटायला आले होते. सरकारकडून आलेत का? हे मी त्यांना आधीच विचारले. सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी करु असं म्हटले होते. ती का केली नाही. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याऐवजी जास्त गुन्हे दाखल केले जात आहेत.

हैदराबाद गॅझेट घेतो म्हणाले होते ते अजून का घेतले नाहीत? ते जर समाज म्हणून करत असतील तर आम्ही अशोक चव्हाण यांना काहीही दोष देणार नाही. आमची फसवणूक झाली असल्याचं मी त्यांना ठासून सांगितले. जाणून बुजून गृहमंत्री यांनी आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करायला लावले. सग्या सोयऱ्याची अमलबजावणी एकनाथ शिंदेसाहेबांनी केली नसल्याचं यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले.(Manoj Jarange)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!