Skip to content

Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी; फडणवीस म्हणाले…

Manoj Jarange

Manoj Jarange |  मागील दोन दिवसांपासून मराठा आंदोलन पुन्हा पेटले असून, परवा मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप केले होते. तार, त्यानंतर ते तातडीने मुंबईला सागर बंगल्याच्या दिशेने निघाले होते. रात्री त्यांनी एका गावात मुक्काम केला होता. त्यानंतर सकाळी त्यांनी अचानक त्यांचा निर्णय बदलला आणि ते माघारी फिरले व पुन्हा त्यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी पोहोचले. त्यानंतर दुपारच्या सुमारास त्यांनी मध्यमांसमोर आपण उपोषण मागे घेत असल्याचेही जाहीर केले. काल जिल्हाधिकाऱ्यांनी अंबडमध्ये संचारबंदी लागू केली असून, काही जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा देखील खंडित करण्यात आली होती. (Manoj Jarange)

दरम्यान, आज विधानसभा अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला. तर, मनोज जरांगे यांच्या आरोपांवरून विधानसभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळालं. दरम्यान, मराठा आंदोलनावरुन आणि मनोज जरांगे यांच्यावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ उडाला.

Manoj Jarange | मनोज जरांगेंवर गुन्हे दाखल; आता माघार उपोषणही स्थगित

Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी

दरम्यान, आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. हिंसा करणे अथवा हिंसक वक्तव्य करणाऱ्याला लोकशाहीत स्थान नाहीच. त्यामुळे यासाठी योग्य उपाय योजना करण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची आहे. या बाबींचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने या प्रकरणाची सविस्तर एसआयटी चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे.(Manoj Jarange)

फडणवीसांची पहिल्यांदाच जरांगेंवर प्रतिक्रिया

परवा मनोज जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आज पहिल्यांदाच त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून, ते म्हणाले की ”मला यावर बोलायचं नव्हतं. पण ⁠मराठा समाजच्या संदर्भात मी काय केलं हे महाराष्ट्राला  माहीती आहे. ⁠मी राज्याचा मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं व ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात टिकवलंही. ⁠सारथीला निधी व शिष्यवृत्ती दिली, ⁠कर्जही दिले. ⁠मराठा समाजासंदर्भात मला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नसून, ⁠जरांगे हे माझ्यावर बोलल्यानंतर मराठा समाज हा माझ्या पाठीशी उभा राहिला, ⁠त्यांच्या नाही”, असं फडणवीस म्हणाले. (Manoj Jarange)

Manoj Jarange | मनोज जरांगेंची माघार; सहकारी पोलिसांच्या ताब्यात

⁠त्यांना कोण मदत करतंय, ⁠हे सगळं बाहेर येईल

तसेच यावेळी ते म्हणाले की,”एकीकडे शिवाजी महाराजांचं नाव घ्याचचं व दुसरीकडे शिव्या द्यायच्या. लाठीचार्ज होण्याआधी मनोज जरांगे यांना परत कोणी आणलं?, ⁠त्यांना घरी कोण भेटलं होतं?, दगडफेक करायला कोणी सांगितले?, ⁠पोलीस आपले नाहीये का? मराठा समाजाला विघटीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ⁠त्यांना पैसे कोण देत आहे?, ⁠त्यांना कोण मदत करतंय, ⁠हे सगळं बाहेर येईल. पुढे ते म्हणाले की,”जरांगे पाटील यांच्याशी मला घेणं देणं नाही, ⁠पण त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे शोधल जाईल”,असा सूचक इशाराही यावेळी फडणवीसांनी दिला. (Manoj Jarange)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!