Budget Session 2024 | अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पात केल्या ‘या’ घोषणा

0
4
Ladki Bahin Yojna
Ladki Bahin Yojna

Budget Session 2024 |  राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे आता राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत. सध्या कालपासून राज्य विधीमंडळाचं पाच दिवसीय अधिवेशन सुरु असून, आज यात अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येत आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे काय घोषणा करतात याची सर्वांनाच उत्सुकता होती. दरम्यान, अखेर त्यांनी वाचनाला सुरुवात केली असून, त्यांनी पुढील घोषणा केली आहे.

  • जुन्नर येथे शिवसंग्रहालय उभारणार
  • ११ गडकिल्ल्यांना जागतिक पातळीवर जाण्यासाठी युनेस्कोला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
  • शिवकालीन ३२ गडकिल्ल्यांचे नुतनीकरण
  • ७ हजार ५०० किमीच्या रस्त्यांची कामे सुरू होणार आहे.
  • सार्वजनिक बांधकाम विभागास १९ हजार कोटींच्या निधीला मान्यता
  • देशातील पहिली मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भुसंपदान पूर्ण झाले. (Budget Session 2024)
  • सोलापूर-तुळजापूर-धाराशिव येथे रेल्वे मार्गासाठी भुसंपादनास सुरुवात
  • संभाजीनगर विमानतळाच्या विस्तारासाठी अर्थिक तरतूद सुरू आहे.
  • जम्मू काश्मीर आणि अयोध्या येथे महाराष्ट्र भवन बांधणार

⁠वर्सोवा ते वांद्रे सागरी सेतूचा पालघरपर्यंत विस्तार केला जाणार (Budget Session 2024)

Budget Session | आजपासून विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; हे मुद्दे गाजणार

Budget Session 2024 |  महिलांना साडी देणार

  • सामान्य प्रशासन विभागाला १ हजार कोटी रुपये प्रस्तावित आहेत.
  • यावर्षी जानेवारीमध्ये दावोस येथे १९ कंपन्यांसोबत करार झालेत.
  •  शिधा वाटप करताना एका कुटुंबातील महिलेस १ साडी देणार.
  • निर्यात वाढीसाठी ५ इंडस्ट्रियल पार्क तयार करणार.
  • ‘मेक इन इंडिया’ धोरणांतर्गत १९६ कोटी रुपये निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या ठिकाणी मॉल उभाररण्यात येणार

Budget 2024 | बजेटमध्ये महिला आणि शेतकऱ्यांसाठी काय..?

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय..?

  • मागेल त्याला सुर पंप योजना सुरू करणार

शेळी मेंढी वराह योजने अंतर्गत १२९ प्रकल्पांचा प्रस्ताव दिलेला असून, येत्या ३ वर्षात १५५ प्रकल्पांची दुरुस्ती करण्यात येईल मात्र, त्यासाठी १५ हजार कोटी रुपयांची गरज आहे.(Budget Session 2024)

१ लाख महिलांना रोजगार

  • राज्यात ४० टक्के अपारंपारिक उर्जा राबविण्यात येणार
  • राज्यातील ⁠३७ हजार आंगणवाडींना सौर उर्जा देण्यात येणार
  • नुकसानग्रस्त ४४ लाख शेतकऱ्यांना ३ हजार कोटी रुपयांची मदत देण्यात येईल
  • राज्यातील ⁠१ लाख महिलांना रोजगार देण्यात येईल
  • महिलांना पाच हजार ‘पिंक रिक्षा’ दिल्या जाणार
  • १४ लाख आंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरणार
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती, पाडवा, आणि राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त आनंदाचा शिधाचे वाटप (Budget Session 2024)
  • प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक शववाहिका उपलब्ध करुन देणार
  • ‘संजय गांधी निराधार’ या योजनेअंतर्गत पेन्शन १००० वरुन १५०० रुपये केली जाणार
  • सप्तशृंग गडाच्या विकासासाठी निधी मंजूर

     

आजच्या अर्थ संकल्पात सप्तश्रृंगी गडाच्या विकासासाठी 81 कोटी 86 लाख विकास निधीस मंजूरी देण्यात आली. तसेच त्र्यंबकेश्र्वर परिसरातील किल्ल्यांसाठी विकास निधी देण्यात आला. आजचा अर्थसंकल्प हा दिशा दर्शक आहे. श्रीनगर आणि आयोध्या येथे महाराष्ट्र भवन बांधण्यात येण्याचा निर्णय महत्वाचा आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यावर्षीचे बजेट हे राज्याला दिशा देणारे ठरले आहे. वंचित, शोषित, दिव्यागं, कष्टकरी शेतकरी असे सर्वसमावेशक हे बजेट आहे. हे बजेट सर्वसामान्यांचे बजेट आहे. शेतकऱ्यांना तसेच उद्योजकांना या बजेटने भरभरून दिले आहे. आरोग्य, शिक्षण, पर्यटन, शेतकरी, महिला सक्षमीकरण, दळणवळण या सर्व बाबींचा कटाक्षाने समावेश करण्यात आला आहे.

– दादाजी भुसे, पालकमंत्री नाशिक


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here