Budget Session | आजपासून विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; हे मुद्दे गाजणार

0
15
Budget Session
Budget Session

Budget Session |  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहेत. दरम्यान, आजपासून राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून, येणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी सत्ताधारी पक्षांसाठी आजचा दिवस हा निर्णायक ठरू शकतो. आजच्या या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या लेखानुदान अर्थात अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधकांना राज्य सरकारला घेरण्याची संधी असेल. विरोधकांकडून राज्य सरकारच्या कमजोर बाजूंवर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते. तर, या अधिवेशनात काय घडामोडी होऊ शकतात. हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. (Budget Session)

Budget Session | असा असेल अंतरिम अर्थसंकल्प

२७ फेब्रुवारी रोजी सकाळी पुरवणी मागण्यांवर चर्चा केली जाईल आणि त्या मंजूर केल्या जातील. त्यानंतर लगेचच दुपारी दोन वाजता सन २०२४-२५ या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. या अंतरिम अर्थसंकल्पात १ एप्रिल २०२४ ते ३१ जुलै २०२४ या चार महिन्यातील आवश्यक असलेल्या खर्चाची तरतूद करण्यात येईल. यात शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते, कर्जाचे हप्ते, व्याज आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आवश्यक असणाऱ्या खर्चाचा समावेश आहे.(Budget Session)

Budget 2024 | बजेटमध्ये महिला आणि शेतकऱ्यांसाठी काय..?

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचे अधिवेशनात पडसाद

मराठा समाजाला ओबीसी माडून आरक्षण मिळावे. यासाठी सगे सोयऱ्यांचा निर्णय लागू करण्याच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम असून, काल त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप केलेत. आपल्याला सलाईनमधून विष देण्याचा कट असल्याचे ते म्हणाले. तर ते मुंबईतील फडणवीस यांच्या सागर बंगल्याच्या दिशेने निघाले आहेत. (Budget Session)

राज्य सरकारने २० फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मनोज जरांगे हे सगे सोयऱ्यांच्या मागणीवर ठाम असून, ते गेल्या १५ ते १६ दिवसांपासून उपोषण करत आहेत. दरम्यान, याचे मोठे पडसाद हे आजपासून सुरू होणाऱ्या या राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे. आज मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे केंद्र असलेल्या जालना जिलह्यातील अंबड येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून, या मुद्द्यावरून विरोधक सरकारला गहेरू शकतात.

Budget 2024 | ‘सबका साथ सबका विकास’; मोदी सरकार आज जनतेला काय देणार..?

गोळीबार प्रकरणं चर्चेत 

तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नावर देखील विरोधी पक्ष आक्रमक होण्याची शक्यता असून, कल्याण येथील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे महानगरप्रमुख गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यात केलेला गोळीबार, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण, त्यानंतर पुण्यात मिठाच्या पाकीटांमध्ये सापडलेला हजारो कोटी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा हे मुद्दे आजच्या या अधिवेशनात चर्चेचे मुद्दे असणार आहेत. (Budget Session)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here