Horoscope 28 February | ‘या’ लोकांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे; वाचा आजचे राशिभविष्य

0
2
Horoscope 9 May 2024
Horoscope 9 May 2024

Horoscope 28 February |  आजकालच्या जीवनशैलीतील अनेक गोष्टी या तुमच्या मनासारख्या किंवा मनाविरुद्ध होत असतात. ज्योतिष शास्त्रानुसार, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी या ग्रहांच्या प्रभावामुळे घडत असतात. राशिभविष्य हे ग्रहांच्या हालचाली लक्षात घेऊन पंचांगाच्या आधारे केलेले भाकीत होय. तर जाणून घेऊयात की, आजचा २८ फेब्रुवारी बुधवारचा दिवस हा सर्व १२ राशीच्या लोकांसाठी कसा जाईल. वाचा आजचे राशीभविष्य…

मेष राशी –

आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी चांगला असेल. आज तुम्हाला जुन्या शारीरिक त्रासांपासून आराम मिळेल. व्यावसायिकांच्या आज काही मोठ्या आणि नवीन लोकांसोबत भेट होतील. जर तुम्हाला एखाद्या नवीन कामात गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही काही दिवस आणखी प्रतीक्षा करावी. जोडीदारासोबत आज चांगला वेळ जाईल. मात्र, कौटुंबिक समस्या जाणवू शकतात. ज्याचे निराकरण तुम्हाला शांततेत करावे लागेल. आज तुम्ही आरोग्याची काळजी घ्यावी आणि योग्य आहार घ्यावा.(Horoscope 28 February)

वृषभ राशी –

आजचा दिवस हा वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगला असेल. आज तुम्हाला काही ठिकणाहून अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरदार वर्गाच्या लोकांच्या आज पगारात वाढ होऊ शकते. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवू शकतात. तुम्ही तुमच्या जोडीदाराला वेळ द्यायला हवा. आज कामानिमित्त प्रवास होऊ शकतो. तसेच आज तुम्हाला काही सामान्य आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Horoscope 28 February | कर्क राशी –

आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी चांगला जाणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुमची हिंमत वाढेल. आज व्यवसायिकांनी आर्थिक व्यवहार करताना ते अतिशय काळजीपूर्वक करावे. नोकरदार वर्गानेही काम अगदी काळजीपूर्वक करावे. तसेच कामाच्या ठिकाणी टीमवर्क आज तुम्हाला पुढे घेऊन जाईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तसेच आज तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देने गरजेचे आहे. (Horoscope 28 February)

सिंह राशी –

आजचा दिवस हा सिंह राशीच्या लोकांसाठी कसोटीचा दिवस आहे. आज त्यांनी त्यांच्या संस्कारांना समोर ठेवून काम करायचे आहे. व्यवसायिकांना आज त्यांच्या व्यवसायात मेहनतीचे फळ मिळेल. मात्र, आर्थिक व्यवहार सांभाळावेत कारण तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. तुम्ही आज गुंतवणुकीचा विचार करू शकतात. जोडीदाराबाबत कोणतीही कटुता बाळगू नये. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. आरोग्याची काळजी घ्यावी सामान्य समस्या जाणवू शकतात.

मिथुन राशी – 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आज दिवस हा अडचणींनी भरलेला असेल. आज त्यांना मालमत्तेशी संबंधित काही प्रकरणांमध्ये अडचणी येऊ शकतात. व्यवसायिकांनी आज कुठलेही नवे काम हाती घेताना काळजी घ्यावी. कारण आज तुमची फसवणूक होऊ शकते. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगावी. आज तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे. तसेच तुमच्या जोडीदाराच्या भावनांचीदेखील काळजी घ्या.(Horoscope 28 February)

Horoscope 27 February | ‘या’ लोकांसाठी आजचा दिवस फायद्याचा; वाचा आजचे राशिभविष्य

कन्या राशी –

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. व्यवसायिकांची त्यांच्या व्यवसायाबाबत काही कामे प्रलंबित असतील तर, ती मार्गी लागतील. तुमच्या व्यवसायाला पुन्हा गती मिळू शकते. तसेच कामासाठी आज प्रवास होऊ शकतो. आज तुमचे आरोग्य सुधारेल. तसेच तुमचा कामाचा तणाव आणि थकवा दूर होईल. काम मनापासून करा, तुम्हाला यश नक्की मिळणार. (Horoscope 28 February)

तूळ राशी –

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा ज्ञानात भर पाडणारा असेल. आज तुम्ही अनेक अद्भुत गोष्टी जाणून घेऊ शकतात. आज आर्थिक बाबतीत तुमच्या निष्काळजीपणामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. व्यवसायात आर्थिक बाबतीत सतर्क राहणे गरजेचे आहे. तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात वाईट प्रसंग येऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या, ध्यान आणि योगासने करावीत.

वृश्चिक राशी –

वृश्चिक राशीच्या लोकांना आज काही आर्थिक समस्या जाणवू शकतात. त्यांनी आज आपले उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करावा. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आधी बाजाराचे संशोधन करा. नोकरदार वर्गाच्या लोकांच्या काही महत्त्वाच्या कामात अडथळे येऊ शकतात. चांगल्या लोकांच्या सहवासात रहा. आरोग्याबाबत काळजी घेण्याची गरज आयहे. आज काही जुन्या आजारांमुळे त्रास होऊ शकतो.

Horoscope 26 February | ‘या’ लोकांनी शत्रूंपासून सावध रहावे; वाचा आजचे राशिभविष्य

धनु राशी –

आजचा दिवस हा धनु राशीच्या लोकांसाठी वादग्रस्त असू शकतो. त्यामुळे शक्यतो कोणशीही वाद करणे टाळा.  व्यवसायिकांनी तुमच्या व्यवसायात वेळ द्यायला हवा. आज तुम्हाला कामाच्या बाबतीत काही विरोधांचाही सामना करावा लागू शकतो. नोकरदार वर्गाच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी त्यांच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. आरोग्याची काळजी घ्यावी कारण आज तुम्हाला घसा दुखीचा त्रास होऊ शकतो. आज राजकीय क्षेत्राशी संबंधित लोक काही कामासाठी प्रवास करू शकता. (Horoscope 28 February)

मकर राशी –

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आज तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नोकरदार वर्गाचे लोक जर एखाद्या नवीन नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना त्यात नक्कीच यश मिळेल. जोडिदारासोबत तुमचे संबंध सुधारतील. तरुणांनी त्यांची संगत बदलावी. अन्यथा याचा पुढे त्रास होऊ शकतो.

कुंभ राशी –

आजचा दिवस हा कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगला असेल. मात्र, त्यांनी त्यांच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. आज तुम्हाला काही निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. या प्रवासादरम्यान तुमचे भांडण होऊ शकते. तसेच आज तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवले पाहिजे. आर्थिक बाबींमुळे तुम्ही चिंतेत पडू शकता. जोडीदारासाठी वेळ काढा, अन्यथानाते बिघडू शकते. आरोग्याबाबत काळजी घ्या. आज तुम्ही तणावात असू शकता. विद्यार्थ्यांनी आता शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे. नोकरीच्या संधि पुढेही अनेक येतील. (Horoscope 28 February)

मीन राशी –

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा मतभेदांचा दिवस असू शकतो. व्यवसायिकांचे आज व्यवसायातील काही प्रलंबित कामे पूर्ण होईल. आज तुम्ही व्यवसायाबाबत चिंतेत किंवा तणावात असाल. वैवाहिक जीवनात वेळ देणे महत्त्वाचे असते. अन्यथा याचा परिणाम नात्यांवर होऊ शकतो. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून आनंद मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आरोग्याबाबत काळजी घ्या. आज तुम्हाला थकवा जाणवू शकतो.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here