Skip to content

Deola | फुले माळवाडीत कॅन्सर तपासणी शिबीराला उस्त्फुर्त प्रतिसाद

Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  तालुक्यातील फुले माळवाडीत ग्रामपंचायत व एसएमबीटी रुग्णालयाच्या वतीने महिलांसाठी मोफत कर्करोग (कॅन्सर) तपासणी व मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. यावेळी जवळपास ऐंशी महिलांनी या तपासणीचा लाभ घेतला. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने नेत्र रोग तपासणी देखील करण्यात आली. याला गावकऱ्यांचा उस्त्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी लोकनियुक्त सरपंच लंकेश बागुल, उपसरपंच यशोदाबाई पवार, ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री देवमन बागुल, संजय शेवाळे, सुनील गांगुर्डे, नंदकिशोर शेवाळे, वैशाली बच्छाव, कलपना बच्छाव, ग्रामविकास अधिकारी दिनकर खैर, रुपाली बच्छाव, एसएनबीटीचे डॉ. योगेश भदाणे व टीम उपस्थित होते. या उपक्रमाचे गावकऱ्यांनी कौतूक केले आहे.
Dada Bhuse | मंत्री भुसेंनी शब्द पाळला; वन हक्क समितीची आज बैठक


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!