Dada Bhuse | मंत्री भुसेंनी शब्द पाळला; वन हक्क समितीची आज बैठक

0
4
Dadaji Bhuse
Dadaji Bhuse

Dada Bhuse |  शेतकरी व कामगारांच्या मागण्या घेवून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि विविध आदिवासी संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी रविवारी माजी आमदार जीवा गावित यांच्यासह त्यांच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत मध्यस्थी केली होती.

यावेळी वनहक्क जमिनीबाबत तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१८ मध्ये आदेश दिले असून, तसेच यानंतर २०२३ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत आदेश दिले. पण प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी झाली नसल्याचा आक्षेप गावित यांनी घेतला. यावेळी मंत्री भुसे यांनी तातडीने बैठक बोलावण्याची हमी दिली होती. तर, त्यानुसार आज (दि. २७ फेब्रुवारी) रोजी समितीची बैठक होणार आहे.

Dada Bhuse | समितीची आज बैठक 

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम २००६ नियम २००८ सुधारणा नियम २०१२ च्या राज्यातील अंमलबजावणीच्या अनुषंगाने वैयक्तिक वनहक्क धारकांची वनहक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीमध्ये सुसूत्रता आणणे. यासाठी अभ्यास करून शासनास शिफारस करण्यासाठी महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीची बैठक आज दुपारी १.३० वाजता महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.

Dada Bhuse | टवाळखोरांच्या धिंड काढा; पालकमंत्र्यांचे पोलिसांना कठोर निर्देष

नंदुरबार प्रकल्पाचे घरकुल नाशिक प्रकल्पास

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री दादाजी भुसे यांनी गावित यांनी मांडलेल्या मागण्यांचा विचार करुन स्थानिक स्तरावरील प्रश्न जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना तातडीने सोडवण्याचे आदेश दिले. तार, त्यात जिल्ह्याला घरकुल योजनेचे उद्दिष्ट कमी असून त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने नंदुरबार प्रकल्पात लाभार्थी मिळत नसल्याने तिकडचे घरकुल नाशिक प्रकल्पास देण्याबाबत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना आदेश दिले आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here